कल्याण डोंबिवलीत  १५१ नवे रुग्ण तर १ जणाचा मृत्यू...| ४९,९२८ एकूण रुग्ण तर १००२ जणांचा आतापर्यंत मृत्यू...| तर २४ तासांत १६७ रुग्णांना डिस्चार्ज...

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १५१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १ जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

कल्याण डोंबिवलीत  १५१ नवे रुग्ण तर १ जणाचा मृत्यू...| ४९,९२८ एकूण रुग्ण तर १००२ जणांचा आतापर्यंत मृत्यू...| तर २४ तासांत १६७ रुग्णांना डिस्चार्ज...
151 new patients and 1 death in Kalyan Dombivali ... | 49,928 total patients and 1002 deaths so far ... | 167 patients discharged in 24 hours ...

कल्याण डोंबिवलीत  १५१ नवे रुग्ण तर १ जणाचा मृत्यू

४९,९२८ एकूण रुग्ण तर १००२ जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत १६७ रुग्णांना डिस्चार्ज...

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १५१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १ जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आजच्या या १५१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४९,९२८ झाली आहे. यामध्ये १७४० रुग्ण उपचार घेत असून ४७,१८६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १००२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १५१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२९, कल्याण प -३१, डोंबिवली पूर्व ५२, डोंबिवली प- ३०, मांडा टिटवाळा - ४, मोहना - २, तर पिसवली येथील ३ रूग्णांचा समावेश आहे. 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २३ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ६ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, २ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल येथून, ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे

 प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________