सकाळी रिकाम्या पोटी धने पाणी पिण्याचे काय फायदे?

आपल्या सर्वांना माहीती आहे की, धने पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

सकाळी रिकाम्या पोटी धने पाणी पिण्याचे काय फायदे?
coriander water benefits

सकाळी रिकाम्या पोटी धने पाणी पिण्याचे काय फायदे?

आपल्या सर्वांना माहीती आहे की, धने पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. 

आपल्या सर्वांना माहीती आहे की, धने पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेषत: भारतीय खाद्यपदार्थांमध्ये धने मोठ्या प्रमाणात वापरली जातात. हा एक सामान्य मसाला आहे जो जवळ-जवळ सर्व घरांमध्ये आढळतो. संपूर्ण धणे बियाणे बहुधा करी, भाज्या आणि सूप चवीसाठी वापरले जातात. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, धने पाणी पिण्यामुळे आपले वाढलेले वजन कमी करण्यास देखील मदत होते.(coriander water benefits)

भारतीय जेवणातील रुचकरता वाढवणा-या अनेक महत्त्वपूर्ण मसाल्यांपैकी धणे हा देखील एक अतिशय लाभदायक मसाला आहे. कोथिंबीर, धणे व धणे पावडर या सर्व पदार्थांचा वापर आहाराला एक वेगळा मनमोहक स्वाद व रुचकरता देण्यासाठी केला जातो पण याव्यतरिक्त हे सर्व पदार्थ आरोग्यासाठी देखील अत्यंत लाभदायक असतात.

धण्यांमध्ये फ्लेवोनोइड, पॉलीफेनॉल, बी-कॅरोटीनॉइड, आयर्न, कॅल्शियम, मिनरल्स, फायबर, मॅग्नेशियम सोबतच व्हिटॅमिन ए, आणि क हे पोषक घटक आढळतात. यामधील औषधी गुणधर्मांना आयुर्वेदात देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. एका अध्यनानुसार, धणे व कोथिंबीर हे अॅंटीइन्फ्लामेट्री व जीवानुरोधी असतात. चला तर अशा या सर्वगुणसंपन्न असणा-या धण्यांमुळे काय काय आरोग्यवर्धक फायदे होतात व याचा वापर कसा करावा हे जाणून घऊयात.

हे पाणी बनवण्यासाठी रात्री 1 कप पिण्याच्या पाण्यात 1 चमचे धणे भिजवून ठेवा. हे पाणी सकाळी गाळून घ्या. त्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. या बिया सुकवून तुम्ही करी वापरू शकता.धणे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात. हे संक्रमण आणि इतर अनेक आजार होण्यापासून प्रतिबंधित करते.

 धन्यामध्ये असे गुणधर्म आहेत, जे तुमची पचनसंस्था निरोगी बनवते. तसेच पचनाशी संबंधित अनेक आजार बरे करण्यास मदत करते. सकाळी त्याचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी राहते. हे चयापचय वाढवते. यामुळेच वजन कमी होण्यास मदत होते.धन्यामध्ये व्हिटॅमिन के, सी आणि ए भरपूर प्रमाणात असते. हे केस मजबूत करण्यास आणि वाढण्यास मदत करते. केसांसाठी तुम्ही धणे तेल किंवा हेअर मास्क वापरू शकता.

 धन्यामध्ये लोह भरपूर असते. यात बुरशीविरोधी, बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. धने पाण्याच्या सेवनाने चेहरा चमकदार होतो. हे आपली त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.धने पाणी तुमच्या शरीरातून विष बाहेर काढण्यास मदत करू शकते. तुम्ही सकाळी धने पाणी पिऊन तुमची प्रणाली डिटॉक्स करू शकता.सकाळी धने पाणी प्यायल्याने तुम्ही ऊर्जावान राहता. ते तुमच्या शरीराला डिटॉक्स करते. त्यातून तुम्हाला निरोगी वाटते. मधुमेहाने ग्रस्त लोकांनी सकाळी धने पाणी पिण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.(coriander water benefits)

कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते आणि हायपोग्लाइसीमिया होऊ शकतो.