डोंबिवलीत अनधिकृत बांधकामाच्या नावावर बिल्डरांकडून तब्बल 8 कोटी रुपये उकळण्याचा प्रकार…

डोंबिवलीत अनधिकृत बांधकामाच्या नावावर बिल्डरांकडून तब्बल 8 कोटी रुपये उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बिल्डरांनी तक्रार दिल्यानंतर 4 जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवलीत अनधिकृत बांधकामाच्या नावावर बिल्डरांकडून तब्बल 8 कोटी रुपये उकळण्याचा प्रकार…
8 crore from builders in the name of unauthorized construction in Dombivali

डोंबिवलीत अनधिकृत बांधकामाच्या नावावर बिल्डरांकडून तब्बल 8 कोटी रुपये उकळण्याचा प्रकार…
 

डोंबिवली, 09 डिसेंबर : डोंबिवलीत अनधिकृत बांधकामाच्या नावावर बिल्डरांकडून तब्बल 8 कोटी रुपये उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बिल्डरांनी तक्रार दिल्यानंतर 4 जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्वेतील नांदिवली परिसरात काही इमारतींचे काम सुरू आहे. या परिसरात काही वर्षांपासून बिल्डर वर्गीस म्हात्रे, विक्रांत सिंग आणि काही बिल्डर इमारतीचे बांधकाम करीत आहेत. या बिल्डरांना अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली ब्लॅकमेल करून 8 कोटी रुपये उकळल्याचा आरोप विद्या म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, एकनाथ म्हात्रे आणि सुनील म्हात्रे यांच्यावर करण्यात आला आहे.

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पत्रकार परिषद घेऊन बिल्डर हितेन वर्गीस म्हात्रे आणि आर्यन विक्रांत सिंग यांनी मागणी केली आहे की, ‘सदर महिला आणि तिच्या नातेवाईकांनी वारंवार आम्हाला ब्लॅकमेल करून आतापर्यंत 8 कोटी रुपये घेतले आहेत. त्यामध्ये काही फ्लॅटचा देखील समावेश आहे.’

‘या महिलेला आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करून आम्हाला न्याय दिला पाहिजे. सदर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे वैध करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बिल्डरांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, हा सगळा व्यवहार चेक द्वारे झाला आहे

भिवंडी ठाणे

प्रतिनिधी : सत्यवान तरेे

___________