स्व. इंदिराजी व सरदार पटेलांना काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभिवादन...

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांना ३६ व्या पुण्यतिथी निमित्त व भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना १३५ व्या जयंतीनिमित्त पिंपरी अजमेरा काॅलनी येथे काँग्रेस पदाधिका-यांकडून अभिवादन करण्यात आले.

स्व. इंदिराजी व सरदार पटेलांना काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभिवादन...
Congress workers greet Indiraji and Sardar Patel (Pledge of Commitment to National Unity)
स्व. इंदिराजी व सरदार पटेलांना काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभिवादन...

स्व. इंदिराजी व सरदार पटेलांना काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभिवादन
(राष्ट्रीय एकात्मतेसाठी कटिबध्दतेची प्रतिज्ञा)

पिंपरी दि. ३१ : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांना ३६ व्या पुण्यतिथी निमित्त व भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना १३५ व्या जयंतीनिमित्त पिंपरी अजमेरा काॅलनी येथे काँग्रेस पदाधिका-यांकडून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी इंदिराजी व सरदार पटेल यांच्या प्रतिमांना अशोक मोरे व नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच राष्ट्रीय एकात्मतेसाठी कटिबध्दतेची प्रतिज्ञा सामुहिक स्वरूपात घेण्यात आली. 

या प्रसंगी बोलताना अशोक मोरे म्हणाले, 
“इंदिराजींनी देश घडवला देशात विकासाचे नंदनवन फुलवले व देश संरक्षण दृष्टया, कृषी क्षेत्रात, औद्योगिक बाबतीत तसेच अर्थिक नियोजनाच्या बाबतीत देश संपन्न केला, प्रसंगी प्राणांची पर्वा न करता कठोर निर्णय ही घेतले. जागतिक स्तरावर देशाची मान उंचविण्याचे काम इंदिराजीनीं केले. ख-या अर्थाने इंदिराजीनी भारतमातेच्या भूमिकेत भारत देशाचे संगोपन केले.”

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस अशोक मंगल, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासिर चौधरी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोहगाव , पुणे

प्रतिनिधी - आत्माराम काळे

__________