शिक्षकांच्या कोविड चाचणीसाठी उडाला गोंधळ...| एका दिवशी फक्त १०० टेस्टचीच व्यवस्था; सेंटरवर जमा झाले २०० शिक्षक...| कोविड सेंटर चालक व कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ...

सोमवारपासून शाळा सुरु होणार असून त्यासाठी शिक्षकांना कोविड चाचणी ही बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र नियोजनाच्या अभावामुळे कल्याणमध्ये कोविड सेंटरवर मोठय़ा प्रमाणात शिक्षक कोविड चाचणीकरीता जमा झाले. त्यामुळे कोविड सेंटर कर्मचारयांची एकच तारांबळ उडाली. चाचणीसाठी केवळ १००  किट उपलब्ध असताना २०० पेक्षा जास्त शिक्षक जमा झाल्याने त्यांची चाचणी कशी करणार असा प्रश्न सेंटरपुढे उभा ठाकला आहे.

शिक्षकांच्या कोविड चाचणीसाठी उडाला गोंधळ...

एका दिवशी फक्त १०० टेस्टचीच व्यवस्था; सेंटरवर जमा झाले २०० शिक्षक...

कोविड सेंटर चालक व कर्मचाऱ्यांची उडाली  तारांबळ...

कल्याण : सोमवारपासून शाळा सुरु होणार असून त्यासाठी शिक्षकांना कोविड चाचणी ही बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र नियोजनाच्या अभावामुळे कल्याणमध्ये कोविड सेंटरवर मोठय़ा प्रमाणात शिक्षक कोविड चाचणीकरीता जमा झाले. त्यामुळे कोविड सेंटर कर्मचारयांची एकच तारांबळ उडाली. चाचणीसाठी केवळ १००  किट उपलब्ध असताना २०० पेक्षा जास्त शिक्षक जमा झाल्याने त्यांची चाचणी कशी करणार असा प्रश्न सेंटरपुढे उभा ठाकला आहे.

दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर सोमवारपासून नववी ते १२ वी चे वर्ग भरविले जाणार आहेत अशी घोषणा सरकारच्या शिक्षण खात्याने केल्यानंतर सर्व शिक्षकांसाठी कोविडची चाचणी ही बंधनकार करण्यात आली आहे. यासाठी ठिकठिकाणी शिक्षक कोविड चाचणी करुन घेत आहे. कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली याठिकाणी महापालिकेचे कोविड सेंटर आहे. हे सेंटर एका खाजगी संस्थेकडून चालविले जात आहे. या कोविड सेंटरसमोर शिक्षकांनी कोविड चाचणी करीता गर्दी केल्याने याठिकाणी सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता.

कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने कोविड सेंटरमधील कर्मचारीही हैराण झाले अहेत. सकाळी सात वाजल्यापासून शिक्षकांनी रांग लावण्यास सुरुवात केली. चाचणीसाठी सकाळी ९ वाजताची वेळ असतांना हे सेंटर ११  वाजता उघडले गेले. त्या दरम्यान शिक्षकांना त्रस सहन करावा लागला. या सेंटरमध्ये फक्त १०० कोविड टेस्ट किट उपलब्ध असल्याने २०० पेक्षा जास्त शिक्षक त्याठिकाणी चाचणीसाठी आले होते. त्यामुळे सगळयांची टेस्ट कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला.

तर इतर जिल्ह्यामध्ये फक्त ९ वी ते १२ वी पर्यतच्या शिक्षकांनाच कोविड चाचणी करण्यास सांगितलेली असतांना आपल्या इथे मात्र सरसकट सगळ्या शिक्षकांना हि कोरोना चाचणी करण्यास सांगितले आहे. यात देखील आधी शिक्षकांची थर्मल चाचणी करणे, त्यात लक्षणे दिसल्यास त्यांची अँटीजेन टेस्ट करणे, यानंतर मग आरटी पीसीआर चाचणी करणे आवश्यक असतांना सगळ्यांचीच आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा पर्याय असल्याचे मत शेखर कुलकर्णी या शिक्षकाने व्यक केले आहे.  वसंत व्हॅली कोविड सेंटर प्रमाणेच रुक्मिणीबाई रुग्णालयात देखील हि चाचणी करून घेण्यासाठी रांग लागल्याचे पाहायला मिळाले.

       "कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी संख्या ३५००हुन अधिक आहे. यामध्ये मनपाक्षेत्रात राहणारे शिक्षक व कामानिमित्त मनपा क्षेत्राबाहेर काम करणाऱ्या कर्मचारी संख्या लक्षणीय आहे. शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी शासन आदेशानुसार कोवीड चाचणी करण्यासाठी कोवीड चाचणी केन्द्रावर एकाच दिवशी जात असल्याने सोशल डिस्टन नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. उद्या पासुन गौरीपाडा येथील क्रस्ना कोवीड चाचणी केंन्द्रात देखील कोवीड चाचणी करण्यात येणार आहे. शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी समन्वय साधत प्रशासनास सहकार्य करीत सोशल डिस्टन नियमांचे पालन करावे असे साथरोग आधिकारी डॉ. प्रतिभा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले."

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________