कोरोनाच्या लसीकरणाची रंगीत तालीम पालघर जिल्ह्यात तीन ठिकाणी...
देशाला आणि राज्याला गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांना हैराण केले आहे. आज ही कोरोनाच संकट टळलेले नाही. या कोरोना महामारीवर लस उपलब्ध झाल्याने ती लस सर्वप्रथम कोरोनायोध्याना देण्याचे राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार या कोरोनाच्या लसीकरणाची पालघर जिल्ह्यात शुक्रवारी तीन ठिकाणी रंगीत तालीम घेण्यात आली.

या कार्यक्रमाला पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा उपाध्यक्ष आणि आरोग्य सभापती निलेश सांबरे उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठीच्या हालचालींना वेग आला असून या लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) शुक्रवारी पालघर शहरातील माता बाल संगोपन केंद्र, तसेच मासवण येथील आश्रमशाळा या ठिकाणी या लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. या तालमीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा कर्मचारी व इतर २५ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी लसीकरणासंदर्भात आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे.
त्यासाठी पालघर जिल्ह्यातील १६ हजार कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी एकावेळी एक हजार लाभार्थ्यांना लस देण्याचे योजिले आहे. या रंगीत लसीकरणाच्या तालमीत प्रत्यक्षात लाभार्थ्यांना लस जरी दिली जाणार नसली. तरी झालेल्या पूर्व तयारीची चाचपणी करण्यासाठी या दोन्ही ठिकाणी फक्त प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
जेव्हा प्रत्यक्षात लस करण्याची वेळ येईल तेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारची तारांबळ होऊ नये यासाठी या तालमीचे आयोजन करण्यात आले होते. येणारी लस ही १० डिग्रीसेल्शिअस तापमानाची असल्यामुळे प्रशासनाने त्यासाठी पुर्ण पूर्व तयारी करून त्यासाठी ११ ठिकाणी शीतगृहे तयार केली आहेत. असे जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सूर्यवंशी यांनी सांगितले. आलेली लस पहिल्या टप्प्यात ज्या लाभार्थ्यांनी आपले नाव नोंदणी केले आहे.
अशा लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे. मात्र ही लस देताना प्रत्येक लाभार्थ्यांना आपले ओळखपत्र घेऊन येणे महत्त्वाचे आहे. नाव नोंदणी असून एखाद्या लाभार्थ्यांने आपले ओळखपत्र दाखविले नाही, त्यास लस दिली जाणार नसून ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे. असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी या कार्यक्रमावेळी सांगितले. मात्र किती कर्मचाऱ्यांना जी मिळेल हेच पाहणे औवचित्याचे ठरेल.
पालघर
प्रतिनिधी - राजेंद्र पाटील
___________