छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा...

तलवार तर सर्वांच्या हातात होती, ताकत तर सर्वांच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त महाराजां मध्ये होती..

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा...
Chhatrapati Shivaji Maharaj Royal Seal
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा...

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा...

आदिलशहाने शहाजीराजांना पुण्यासह दक्षिण कर्नाटकातील जहागीर देत त्यांची तिकडे रवानगी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्याचा कारभार सोपवण्यात आला. आऊसाहेबांची माया मोठी, जरब मोठी, स्वप्न मोठी... आऊसाहेब हा कारभार पाहू लागल्या.

शहाजीराजेंची नेमून दिलेली माणसे अगदी निष्ठावंत आणि प्रामाणिक होती. बाजी पासलकर, दादोजी कोंडदेव, गोमाजी नाईक, पानसंबळ नूरखानबेग, बंकीराव गायकवाड, येसबा दाभाडे, नारोपंत मुजुमदार आणि आणखी असेच काही ताकदीचे आणि युक्तिबुद्धीच्या ऐपतीचे हे सारे होते.  

शहाजीराजेंचे स्वप्न साकार करीत जिजाऊ मातेच्या मार्गदर्शनाने आपल्या स्वराज्याचे प्रतीक म्हणून महाराजांनी दोन गोष्टी स्वीकारल्या. एक स्वराज्याचा डौलाने फडकणारा भगवा झेंडा आणि दुसरे स्वतःच्या राज्याची राजमुद्रा. या राजमुद्रे वरील मजकूर संस्कृत मध्ये लिहिला गेला होता. तो असा की:

"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"

 अर्थात : 
ज्या प्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजीराजेंचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकीक वाढत जाईल. 

हि राजमुद्रा महारांजांनी धारण केली. दस्तऐवजांचा अधिकृतपना दर्शवण्यासाठी हि राजमुद्रा उठवण्यात येऊ लागली. 

________________