केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणासाठी गाईडलाईन्स जारी...| पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा मानस...

केंद्रातील मोदी सरकारने कोरोना लसीकरणासाठी गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. तसे निर्देश केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना देण्यात आलेले आहेत.

केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणासाठी गाईडलाईन्स जारी...|  पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा मानस...
Central Government issues guidelines for corona vaccination ... | The intention to vaccinate 30 crore people in the first phase ...

केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणासाठी गाईडलाईन्स जारी...

पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा मानस...

पिंपरी : केंद्रातील मोदी सरकारने कोरोना लसीकरणासाठी गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. तसे निर्देश केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना देण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये कोरोना लसीकरण कसे केल जाईल, तसेच याची संपूर्ण नियमावली राज्यांना पाठवली आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले होते की, कोरोना लस आल्यानंतर ती लोकांपर्यंत कशी पोहोचवण्यात येईल, यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे.

पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात येणार आहे. दरम्यान, कोणत्या कोरोना लसीचा पहिला डोस भारतात देण्यात येणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु, केंद्र सरकारने कोरोनाच्या लसीकरण्याची संपूर्ण तयारी केली आहे.

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 50 वर्षांवरील त्या व्यक्ती ज्यांना एखादा आजार आहे. तसेच 50 वर्षांखालील त्या व्यक्ती ज्या मधुमेह, कॅन्सर, हृदयरोग यांसारख्या आजारांनी ग्रस्त आहेत. तसेच सरकारी किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्स यांसारखे हेल्थ वर्कर्सना लस देण्यात येणार आहे. फ्रंटलाइन वर्कर्स म्हणजेच, तिनही सैन्यदलांचे प्रमुख, पॅरा मिलिट्री, म्युनिसिपल वर्कर्स आणि राज्यांतील पोलीस कर्मचारी.

लसीकरणासाठी प्रत्येकी पाच लोकांची टीम तयार करण्यात येणार आहे. यांना वॅक्सिनेटर ऑफिसर म्हटलं जाईल. पहिला वॅक्सिनेटर ऑफिसर लसीकरणाच्या ठिकाणी असेल, जो सर्व आवश्यक कागदपत्र तपासल्यानंतरच कोरोना लस घेण्यासाठी सेंटरमध्ये येण्यास परवानगी देईल. त्यानंतर दुसरा ऑफिसर Co Win शी डेटा जोडून पाहिल. तिसरा वॅक्सिनेटर ऑफिसर डॉक्टर असून व्यक्तीला लस देण्याचे काम करणार आहे. उर्वरित दोन वॅक्सिनेटर 30 मिनिटांपर्यंत लसीचा डोस दिलेल्या व्यक्तीचे निरिक्षण करतील आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचंही काम करतील. लसीकरणाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. एका दिवसात जवळपास एक सेशन होईल आणि यामध्ये जवळपास 100 ते 200 लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात येईल.

पुणे

प्रतिनिधी - आत्माराम काळे

___________