व्यंगचित्रकार  शरद महाजन यांनी  रेखाटले कोरोना मिशनचे व्यंगचित्र...

मा.पंतप्रधानांनी संपूर्ण भारतात कोरोनाची महामारी रोखण्यासाठी प्रदिर्घ काळासाठी लाॅकडाऊन जाहीर केला आणि भारत जणू आहे तिथेच थांबला.संपुर्ण जगात थैमान घालणारा हा कोरोना मानवजातीच्या उरावरच बसला.कोण कधी जाईल याची भिती सर्वांच्या मनात आणि घरातल्या घरात होणारी घुसमट यामुळे सर्वत्र भेदरलेले चेहरे घराच्या खिडकीतून डोकावत  होती.अनेकांचे रोजगार गेले.काही माणसं उपासमारी  मुळे तर काही गंभीर आजारांमुळे सोडून गेली.

व्यंगचित्रकार  शरद महाजन यांनी  रेखाटले कोरोना मिशनचे व्यंगचित्र...
Cartoonist Sharad Mahajan drew cartoons of Corona Mission ...
व्यंगचित्रकार  शरद महाजन यांनी  रेखाटले कोरोना मिशनचे व्यंगचित्र...
व्यंगचित्रकार  शरद महाजन यांनी  रेखाटले कोरोना मिशनचे व्यंगचित्र...
व्यंगचित्रकार  शरद महाजन यांनी  रेखाटले कोरोना मिशनचे व्यंगचित्र...

व्यंगचित्रकार  शरद महाजन यांनी  रेखाटले कोरोना मिशनचे व्यंगचित्र...

दि.१७ मार्च २०२० पासून मा.पंतप्रधानांनी संपूर्ण भारतात कोरोनाची महामारी रोखण्यासाठी प्रदिर्घ काळासाठी लाॅकडाऊन जाहीर केला आणि भारत जणू आहे तिथेच थांबला.संपुर्ण जगात थैमान घालणारा हा कोरोना मानवजातीच्या उरावरच बसला.कोण कधी जाईल याची भिती सर्वांच्या मनात आणि घरातल्या घरात होणारी घुसमट यामुळे सर्वत्र भेदरलेले चेहरे घराच्या खिडकीतून डोकावत  होती.अनेकांचे रोजगार गेले.काही माणसं उपासमारी  मुळे तर काही गंभीर आजारांमुळे सोडून गेली.

या अदृश्य आणि घातक महाविनाशक विषाणूने माणसांना जगावं की मरावं या विचारावर आणून सोडलं.सभोवताली घडणाऱ्या या घटना शरद महाजन सर (निवृत्त उपमुख्यापक ) लाल बहादूर शास्त्री हायस्कुल नमोर जिल्हा पालघर यांना  स्वस्थ बसू देत नव्हत्या.कोरोना लाॅकडाऊन कालावधीत मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून कोरोना पासून सावधगिरी कशी बाळगावी या विषयावर उदबोधक अशी व्यंगचित्र काढायला  त्यांनी सुरुवात केली.

कोरोना महामारी विषयी जनजागृती करण्यासाठी ही व्यंगचित्र मोलाची ठरली.माझ्या कुटुंबात भावांना देखील कोरोनाची लागण झाली तेंव्हा कोरोनाचे भयंकर रूपवर्णन त्यांच्याच शब्दांत मी ऐकले तेंव्हा अंगावर काटाच उभा राहिला.एक सामाजिक बांधिलकी मानून व्यंगचित्र माध्यमातून छोटासा प्रयत्न सरांनी  केला.या कोरोना विरूद्धच्या लढ्यात अनेक डाॅक्टर्स,नर्स,पोलीस आणि अनेक कोरोना योध्दे धारातिर्थी पडले.या सर्व योध्दांना मानवंदना देण्यासाठी आपणही काहीतरी छोटासा प्रयत्न करावा असे वाटले आणि तिथूनच प्रेरणा घेऊन त्यांच्या हातून अनेक उदबोधक व्यंगचित्र तयार होत गेली.

या कालावधीत त्यांनी काढलेली ही व्यंगचित्र अनेकांच्या मनात देखील कायमस्वरूपी कोरली गेली.कोरोनाची ही महामारीने आपल्याला अनेक जीवनमुल्य सुध्दा दिलीत.आपण ती आयुष्यभर विसरू शकत नाही.
तसेच त्यांचे सर्व विद्यार्थी,शिक्षक सर्वांचे आभार मानले.संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक  होत आहे.

पालघर

प्रतिनिधी - रविंद्र घरत

___________