खोडाळ्यात कॅण्डल मार्च रॅलीचे आयोजन
उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथील झालेल्या अत्याचारी व मानवी जातीला काळिमा लावणारी घटना १४-सप्टेंबर रोजी घडली...

खोडाळ्यात कॅण्डल मार्च रॅलीचे आयोजन
उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथील झालेल्या अत्याचारी व मानवी जातीला काळिमा लावणारी घटना १४-सप्टेंबर रोजी घडली यात पीडित मनिषा वाल्मिकी ईच्यावर ५ नराधमांनी अत्याचार केला व तिच्या हात, पाय व मणका आणि जीभ ही कापण्यात आली. अशा या अत्याचारी घटना उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथे घडली व या पीडित महिलेचे देह ही येथील पोलीस प्रशासनाने घरी न देता मध्य रात्री अग्नी देऊन तिचे देह जाळून टाकले. या भयानक परिस्थितीचा निषेध म्हणून खोडाळा विभागातील काही प्रमुख संघटनांनी निषेध केला यात आद्यक्रांतीविर राघोजी भांगरे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचे अध्यक्ष संजय इधे सर , संजय साळवे ,रघुनाथ हमरे,प्रकाश दोंदे साहेब व भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष देविदास दोंदे , सागर देहाडे ,महेश कदम ,अनिल मोरे आणि बामसेफ चे कार्यकर्ते सचिन पाटील ,धनराज कर्पे ,जनार्दन पाटील ,निजाम भाई , भरत भोये , सामाजिक कार्यकर्ते प्रीतम काळे , संदीप पाटील,युवराज सालकर ,प्रल्हाद कदम साहेब ,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .
सदर कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून मा.प्रल्हाद कदम साहेब,प्रा.संजय ईधे सर ,सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे ,सचिन पाटील व महेश कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध रॅलीत जमलेल्या कार्यकर्त्यांना व जनतेला मार्गदर्शन केले.
सदर रॅलीमध्ये पीडित मनिषा वाल्मिकी ला न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. तसेच आदिवासी समाजाबद्दल अपमानस्पद शब्द बोलणारी कलाकार भारती सिंग वर कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांनच्या विरोधातील बिल (कायदा ) रद्द करण्यात यावा व दलाल मीडिया चा जाहीर निषेध करण्यात आला व सदर निवेदन हे पोलीस अधिकारी काळे साहेब यांना देण्यात आले.
विक्रमगड
प्रतिनिधी - अजय लहारे
________
Also see : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीच्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [आ ]बीड येथे तीव्र आंदोलन
https://www.theganimikava.com/Murbad-taluka-BJP-vice-president-Bhaskar-Sheth-Wadwale-elected