कमी दराने कापुस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - शिरीष भोसले यांची मागणी...

सरकारने या यापाऱ्यावर तात्काळ  गुन्हे दाखल करून शेतक ऱ्याची होत आसलेली पिळवून थांबावी एकीकडे अतीवृष्टीमुळे शेतकर्यांचे संपुर्ण पिके नामोनष्ट झालेली असताना ऊरलासुरलेला कापुस सुद्धा दलाल व्यापारी कमी दराने खरेदी करून शेतकर्यांची लुट करत असल्याचे दिसुन येत आहे.

कमी दराने कापुस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - शिरीष भोसले यांची मागणी...
File a case against traders who buy cotton at low rates - Shirish Bhosale's demand ...

कमी दराने कापुस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - शिरीष भोसले यांची मागणी...

एकीकडे सरकार कापसाला प्रतिक्विंटल5825 रुपये भाव जाहिर करतेय ... दुसरीकडे यापारी वर्ग सर्रास शेतकऱ्याची लुटमार करून 4000 रुपाया खरेदी व्यापारी करतोय ! ! !
सरकारने या यापाऱ्यावर तात्काळ  गुन्हे दाखल करून शेतक ऱ्याची होत आसलेली पिळवून थांबावी...
एकीकडे अतीवृष्टीमुळे शेतकर्यांचे संपुर्ण पिके नामोनष्ट झालेली असताना ऊरलासुरलेला कापुस सुद्धा दलाल व्यापारी कमी दराने खरेदी करून शेतकर्यांची लुट करत असल्याचे दिसुन येत आहे.मुग,कापूस,सोयाबीन,मका तसेच बाजरी या पिकांना शासनाने हमीभावाच स्वरुप लाऊन दिलेले असताना सुद्धा व्यापारी मात्र या मालाची अत्यंत कमी दराने खरेदी करत असुन अशा व्यापार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शिरीष भोसले यांनी केली आहे.

सध्याच्या घडीला बि-बियाणे,खते,तसेच औषधी दुकानदार या मंडळींची बाकी असलेली उधारी अदा करण्याचे दिवस असल्याने शेतकर्यांची कापुस तसेच सोयाबीन,बाजरी व इतर पिके विकण्याची वेळ असते.तसेच आठ दिवसांवर दिवाळी सन असल्यामुळे शेतकर्यांच्या लेकीबाळीला साडीचोळी करण्याची संस्कृती आपल्या शेतकरी समाजात आहे.त्यामुळे या गोष्टींसाठी पैश्यांची गरज असल्याने शेतकरी आता वेचलेला कापुस विकत आहे मात्र हा कापुस कमीतकमी साडे पाच हजार रुपयांनी खरेदी करणे गरजेचे असताना दलाल मंडळी मात्र चार हजार रुपयांनी खरेदी करत असल्याचा आरोप शिरीष भोसले यांनी केला आहे.

शेतकर्यांची लुट करत असलेल्या अशा व्यापाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करुन त्यांची खरेदी दुकाने बंद करावीत व शासनाचे हमीभाव केंद्रे उघडुन जलद गतीने कापूस खरेदी करावा अशी मागणी शेतकरी करु लागला आहे.

केंद्र सरकारने यावर्षी कापसाला हमीभाव ५ हजार ८२५ रुपये दिला असून त्याचा लाभ मिळणारे शेतकरी तुलनेने कमीच आहेत. त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे खरेदी करण्याची हमीभाव केंद्राची उदासीनता व शासनाच ढिसाळ नियोजन आहे.यामुळे हाच कापूस मग चार हजार रुपये क्विंटलच्या आसपास व्यापारी खरेदी करतात. हे संकट टाळण्यासाठीच शासनाचा वेळीच हस्तक्षेप आवश्यक आहे.

कापसाचा उत्पादन खर्चाचा विचार केला तर निव्वळ पाच हजार रुपये हा उत्पादन खर्चावर खर्च होतो अशा परिस्थितीमध्ये जर का व्यापारी कवडीमोल दराने खरेदी करत असेल आणि शासन हमीभाव केंद्र खरेदी करण्यासाठी उदासीन असेल तर शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ही विदारक परिस्थिती ओळखून शासनाने वेळीच हस्तक्षेप करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शिरीष भोसले यांनी केली आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

_________