बहुजन समाजातील युवकांना दारिद्र्यातून मुक्ती हवी असेल तर शिक्षणा सोबतच व्यवसायाची कास धरून आपली व समाजाची आर्थिक प्रगती साधावी :- किशन तांगडे.
सध्या हे युग स्पर्धेचे युग आहे त्यामुळे बहुजन समाजातील युवकांना अठरा विश्व दारिद्रयातून/गरिबीतून मुक्ती हवी असेल तर शिक्षणा सोबतच व्यवसायाची कास धरून आपली,आपल्या कुटूंबाची पर्यायाने समाजाची आर्थिक प्रगती साधावी असे उदगार बहुजन समाजातील नव उद्योजक नितीन वाघमारे यांनी सुरू केलेल्या पोखरी येथे राष्ट्रीय महामार्गावर "हॉटेल बैरागी"च्या उद्घाटना प्रसंगी रिपाईचे तालुका अध्यक्ष किशन तांगडे यांनी काढले.
बहुजन समाजातील युवकांना दारिद्र्यातून मुक्ती हवी असेल तर शिक्षणा सोबतच व्यवसायाची कास धरून आपली व समाजाची आर्थिक प्रगती साधावी :- किशन तांगडे.
( येथील "हॉटेल बैरागी" चा भव्य उद्धघाटन सोहळा किशन तांगडे यांच्या हस्ते संपन्न.)
सध्या हे युग स्पर्धेचे युग आहे त्यामुळे बहुजन समाजातील युवकांना अठरा विश्व दारिद्रयातून/गरिबीतून मुक्ती हवी असेल तर शिक्षणा सोबतच व्यवसायाची कास धरून आपली,आपल्या कुटूंबाची पर्यायाने समाजाची आर्थिक प्रगती साधावी असे उदगार बहुजन समाजातील नव उद्योजक नितीन वाघमारे यांनी सुरू केलेल्या पोखरी येथे राष्ट्रीय महामार्गावर "हॉटेल बैरागी"च्या उद्घाटना प्रसंगी रिपाईचे तालुका अध्यक्ष किशन तांगडे यांनी काढले.
येणाऱ्या युवक पिढीला शैक्षनिक,सामाजिक,राजकीय प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षणा सोबतच जाणीवपूर्वक आपण व्यवसाय देखील केला पाहिजे,जेणे करून व्यवसायाच्या माध्यमातून निश्चितच आपली आर्थिक प्रगती साधली जाईल त्यामुळे युवकांनी पुढाकार घेऊन आणि ठरवून व्यवसायाची कास धरली पाहिजे,असे देखील पुढे रिपाईचे तालुका अध्यक्ष किशन तांगडे हे म्हणाले.
तसेच त्यांनी नितीन वाघमारे यांनी सुरू केलेल्या व्यवसायाला शुभेछा देऊन अडीअडचणीत सर्वोत्तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शहादेव वाघमारे,कृष्णा वाघमारे,गोपीनाथ डोळस,गणपत वाघमारे,राजेश वाघमारे,रवींद्र मोमीन,सोनाजी वाघमारे,ज्ञानेश्र्वर वाघमारे,शुभम बिट्टे,शिवाजी वाघमारे,संतोष मोमीन,समाधान वाघमारे,बंडू पिंगळे,विश्वास लव्हे,राहुल राठोड,भीमा वाव्हळ,भैय्या वाव्हळ,अशोक वाघमारे,अंकुश वाघमारे इत्यादी कार्यकर्ते/युवक उपस्थित होते.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
__________