बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना परभणी केसापुरी येथे संपन्न...

जगाला युद्धाची नाहीतर बुध्दाची गरज आहे,बौद्ध धम्माचा जो समानतेचा रथ आहे तो आज ज्या ठिकाणी आहे तिथून पुढे तो घेऊन जाण्याची जबाबदारी प्रत्येक बौद्ध समाज बांधवांची आहे.

बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना परभणी केसापुरी येथे संपन्न...
Buddha statue installed at Parbhani Kesapuri ...
बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना परभणी केसापुरी येथे संपन्न...
बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना परभणी केसापुरी येथे संपन्न...

बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना परभणी केसापुरी येथे संपन्न...

जगाला युद्धाची नाहीतर बुध्दाची गरज आहे,बौद्ध धम्माचा जो समानतेचा रथ आहे तो आज ज्या ठिकाणी आहे तिथून पुढे तो घेऊन जाण्याची जबाबदारी प्रत्येक बौद्ध समाज बांधवांची आहे, विज्ञाना वर आधारित बौद्ध धर्म हा एकमेव आपल्या सर्वांचा मार्गदाता आहे, असे आपल्या भाषणात बोलते प्रसंगी प्रशांत वासनिक यांनी विचार व्यक्त केले या प्ररसंगी प्रमुख  पाहुने प्रा.वसंत ओगले, प्रा.प्रदिप रोडे,महेश शिंदे,तसेच या प्रसंगी प्रमुख पाहुणे यांची समयोचित भाषणे झाली.अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून परभणी केसापुरी येथील बुद्ध विहारांमध्ये प्रशांत वासनिक यांच्या कडून भव्य अशी बुद्ध मूर्ती भेट देऊन प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी गावाच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढून विहारा समोरील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यामध्ये भंते सुमेद (सोलापूर) प्रमुख पाहुणे प्रशांत वासनिक कार्यक्रमाचे अध्यक्ष माता रमाई महिला मंडळाच्या पदाधिकारी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.प्रदिप रोडे, प्रा.वसंत ओगले, सुभाष तायडे, गुलाबराव भोले, कॅप्टन राजाभाऊ आठवले,ईजि तरकसे,अँड दिपक तांगडे,अशोक गायकवाड, सदाशिव पाटेकर, बौद्धाचार्य ,सामाजिक कार्यकर्ते  माता रमाई महिला मंडळाच्या परभणी केसापुरी येथील महिला कांताबाई चव्हाण, शोभा गायकवाड, वेणूबाई तांगडे, निर्मला चव्हाण, शोभा गायकवाड, अर्चना तांगडे, युवक  कार्यकर्ते सुशिल तांगडे, रोहित गायकवाड, विशाल गायकवाड, विशाल तांगडे, सोमनाथ तांगडे, पवन तांगडे, काळूराम बांगर, निखिल तांगडे, प्रदीप गायकवाड, महादेव तांगडे सौरभ तांगडे विजय तांगडे, रवी कोकाटे , भीमशक्ती युवा ग्रुप आदीसह गावातील प्रतिष्ठित उपासक उपासिका बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेच्या सलग नसलेली नोंदणी करण्यात आली त्यामध्ये प्रमुख म्हणून समता सैनिक दलाचे अमरसिंह ढाका, गौतम कांबळे, दत्तात्रेय सौदरमल, बाळासाहेब शिंदे,बालाजी जगतकर, कार्यक्रमाचे सुञसंचालन सुभाष तांगडे यांनी केले. या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक व बालक बालिका उपासक-उपासिका नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

___________