टेंडरचे पैसे खाण्यासाठी पुलांची कामे काढली जातात : मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप...

पत्रिपुलाच्या गर्डर लॉंचिंगचा भव्य सोहळा सत्ताधारी शिवसेनेने आयोजित केला होता मात्र शहरातील इतर पुलांची आणि त्यांना जोडणाऱ्या रस्त्याची कामे रखडलेली असून ही कामे पूर्ण करण्याचे देणेघेणे सत्ताधारी शिवसेनेला पडलेले नाही. केवळ टेंडरचे पैसे खाण्यासाठीच पुलांची कामे काढली जात असून त्यांना वाहतूक कोंडी आणि जोडरस्ते बाबत काही पडलेली नसून आयुक्त देखील त्यांची री ओढत असतील तर त्यांना जाब विचारावा लागेल असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला.

टेंडरचे पैसे खाण्यासाठी पुलांची कामे काढली जातात : मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप...
Bridge works are carried out to eat tender money : MNS MLA Raju Patil alleges ...
टेंडरचे पैसे खाण्यासाठी पुलांची कामे काढली जातात : मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप...
टेंडरचे पैसे खाण्यासाठी पुलांची कामे काढली जातात : मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप...

टेंडरचे पैसे खाण्यासाठी पुलांची कामे काढली जातात : मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप...

कल्याण : पत्रिपुलाच्या गर्डर लॉंचिंगचा भव्य सोहळा सत्ताधारी शिवसेनेने आयोजित केला होता मात्र शहरातील इतर पुलांची आणि त्यांना जोडणाऱ्या रस्त्याची कामे रखडलेली असून ही कामे पूर्ण करण्याचे देणेघेणे सत्ताधारी शिवसेनेला पडलेले नाही. केवळ टेंडरचे पैसे खाण्यासाठीच पुलांची कामे काढली जात असून त्यांना वाहतूक कोंडी आणि जोडरस्ते बाबत काही पडलेली नसून आयुक्त देखील त्यांची री ओढत असतील तर त्यांना जाब विचारावा लागेल असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला.

पत्रिपुल गर्डर लॉंचिंगचा सोहळा आयोजित करन्यात आला होता. यासाठी पर्यावरणमंत्री शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. त्यांना केलेल्या पुलाचे काम दाखविण्याऐवजी इतर रखडलेल्या पुलांची कामे देखील दाखवा. पत्रिपुल पूर्ण करून वाहतूक कोंडी फुटणार नसून पुलाला जोडणाऱ्या समांतर रोड जवळील जागा शिवसेनेच्या जबाबदार पदाधिकारी आणि माजी महापौर राहिलेल्या व्यक्तीने बळकावली असून मागील ६ महिन्यापासून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्वाची असलेली ही जागा ताब्यात घेण्यासठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत मात्र आद्यपी कारवाई करण्यात आलेली नाही.

यामुळे आयुक्तना ही जागा ताब्यात केव्हा घेणार हे  विचारण्यासाठी आलो होतो मात्र आयुक्तांची भेट होऊ शकली नाही. आयुक्तांनी आता वेळ दिली आहे त्यांच्याशी चर्चा करताना त्यांची भूमिका कळेल. मात्र सत्ताधाऱ्यांच्या कामाची ही पद्धतच आहे. पैसे खाण्यासाठी निविदा काढायच्या आणि कामे रखडवायची.  वाहतूक कोंडी आणि जोडरस्ते याबाबत त्यांना काहीही पडलेली नसून नागरिकांचे हाल होत असल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला. पत्रिपुला कडे येणाऱ्या आमदार पाटील यांच्या ताफ्याला पुलाच्या दुसऱ्याच बाजूला पोलिसांनी रोखले अखेर आमदारांनी कार्यकर्त्यांसह चालत पश्चिमेला येणायचा निंर्णय घेतला पश्चिमेकडे आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________