सफाळ्यामध्ये बोलकी शाळेच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण, लायन्स क्लबचा पुढाकार...

ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होत असून त्याला पर्याय म्हणून बोलकी शाळा आहे. सफाळा परिसरातील पाच शाळांमध्ये बोलकी शाळेचा शुभारंभ शनिवारी टेंभीखोडावे येथे करण्यात आला.

सफाळ्यामध्ये बोलकी शाळेच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण, लायन्स क्लबचा पुढाकार...
Enjoyable education through Bolki School in Safalya, Lions Club initiative ...
सफाळ्यामध्ये बोलकी शाळेच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण, लायन्स क्लबचा पुढाकार...

सफाळ्यामध्ये बोलकी शाळेच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण, लायन्स क्लबचा पुढाकार

      ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होत असून त्याला पर्याय म्हणून बोलकी शाळा आहे. सफाळा परिसरातील पाच शाळांमध्ये बोलकी शाळेचा शुभारंभ शनिवारी टेंभीखोडावे येथे करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट व दिगंत स्वराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सफाळ्यातील जिल्हा परिषदेच्या खोरीचापाडा, टेंभीखोडावे, विराथन बुद्रुक, नावझे व लालठाणे या पाच शाळांमध्ये सुरू करण्यात आला. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळ व संगीत यांचा समावेश असलेला हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अत्यंत आनंददायी आहे.
         या

प्रसंगी दिंगत स्वराज फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रद्धा शृंगारपुरे, लायन्स क्लब ऑफ सफाळे अध्यक्ष तारानाथ वर्तक, सचिव दिनकर वर्तक, उपाध्यक्ष नितीन वर्तक, खजिनदार मनोज म्हात्रे, बोलकी शाळा उपक्रमाचे प्रमुख तथा सहखजिनदार प्रमोद पाटील, टेंभी खोडावे केंद्रप्रमुख दिपिका नाईक, सरपंच संजना पाटील, टेंभी खोडावे शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना पाटील, पाच शाळांचे शिक्षक व लायन्स क्लब सफाळ्याचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना श्रद्धा शृंगारपुरे यांनी  ग्रामीण भागातील नेटवर्क आणि पालकांची आर्थिक परिस्थितीचा विचार करून बोलकी शाळा हा उपक्रम बनविण्यात आलेला आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम लाऊड स्पीकरच्या माध्यमातून सहज शिकता येतो. त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारच्या मोबाईल, लॅपटॉप अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या साहित्याची गरज लागत नाही. विद्यार्थी दूर बसून अथवा समूहा-समूहामध्ये राहून सहज अध्ययन करू शकतात. या उपक्रमांतर्गत सध्या पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.

यावेळी बोलताना सफाळे लायन्स क्लबचे अध्यक्ष तारानाथ वर्तक यांनी कोविडची आपत्ती एक दोन महिन्याने जाणारी आपत्ती नसून या आपत्तीवर मात करून विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येण्यासाठी बोलकी शाळा हा उपक्रम निश्चितच फलदायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. टेंभीखोडावे केंद्रप्रमुख दिपिका नाईक यांनी सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी शिकत आहेत. बोलकी शाळेमुळे त्यांचे शिक्षण आनंददायी होईल अशी आशा व्यक्त केली. तर जिल्हा परिषद शाळा टेंभी-खोडावे मुख्याध्यापिका वंदना पाटील यांनी अभिनव उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपक्रम प्रमुख प्रमोद पाटील यांनी केले तर सचिव दिनकर वर्तक यांनी आभार व्यक्त केले. सोशल डिस्टंसिंग आणि मास्क वापरून कार्यक्रम पार पडला.

         चौकटीत :-
      सफाळे लायन्स क्लबच्या माध्यमातून आमदार मनीषा चौधरी यांच्यामार्फत सफाळे क्लबचे दिवंगत माजी अध्यक्ष अशोक चौधरी यांच्या स्मरणार्थ रामबाग येथील आदिवासी पाड्यांमध्ये वेफरायझर, अर्सेनिक गोळ्या तर परिसरातील काही ग्रामपंचायतीना सॅनिटायझर चिंचणी येथील उद्योजक निमीष सावे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

__________