शिवसेनेमुळे मिळणार ९० जणांना जीवनदान...| उंबर्डे कोळीवली शिवसेना शाखेच्याच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न... | ९० जणांनी केले रक्तदान...
कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र. १ व २ उंबर्डे कोळीवली शिवसेना शाखेच्या वतीने कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद लाभला असून यामध्ये ९० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिवसेनेमुळे मिळणार ९० जणांना जीवनदान...
उंबर्डे कोळीवली शिवसेना शाखेच्याच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न...
९० जणांनी केले रक्तदान...
कल्याण : कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र. १ व २ उंबर्डे कोळीवली शिवसेना शाखेच्या वतीने कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद लाभला असून यामध्ये ९० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामुळे शिवसेनेमुळे ९० जणांना जीवनदान मिळणार आहे.
उंबर्डे कोळीवली विभागात शिवसेनेच्या वतीने शैक्षणिक, सांस्कृतीक व क्रिडा क्षेत्रात अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात. त्यास मिळणारा प्रतिसाद व राष्ट्राचे आणि समाजाचे ऋण लक्षात घेऊन रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान मानून नवीन वर्षाच्या सुरुवातीला उंबर्डे येथे रक्तदान शिबीर आयोजीत केले होते. शिवसेना उंबर्डे - कोळीवली विभागीय शाखेचे रक्तदान शिबिराचे हे २५ वे वर्ष होतं. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परिवहन समिती सभापती मनोज चौधरी, नगरसेवक जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर, नगरसेविका वैशाली भोईर, परिवहन सदस्य सुनील खारूक, शाखा प्रमुख वंडार कारभारी आदींसह अनेक मान्यवर, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक उपस्थित होते.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
___________