वुमेन्स इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स,गांधी भवन,युक्रांद आयोजित रक्तसंकलन शिबिरास प्रतिसाद...
वुमेन्स इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ( गांधी भवन ) ,युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित रक्तसंकलन शिबिराला शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला.

वुमेन्स इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स,गांधी भवन,युक्रांद आयोजित रक्तसंकलन शिबिरास प्रतिसाद...
पुणे : वुमेन्स इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ( गांधी भवन ) ,युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित रक्तसंकलन शिबिराला शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला.३० ऑक्टोबर रोजी रक्तसंकलन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३३ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.
ससून सर्वोपचार रूग्णालय रक्तपेढी च्या सहकार्याने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत गांधी भवन,कोथरूड,पुणे येथे हे शिबीर झाले.भेदाभेद विसरून मानवतेचे नाते जोडण्या साठी सर्वोत्तम माध्यम म्हणून अशा शिबीरांचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगीतले. कोरोनाचा सामना करताना रक्त संकलनाची गरज सध्या अधिक भासते आहे.म्हणून हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
डॉ प्रवीण सप्तर्षी ,अन्वर राजन ,दत्तात्रय मेहेंदळे ,सतीश गिरमे ,संदीप बर्वे ,मिलिंद चव्हाण,एड प्रभा सोनटक्के,एड अर्चना मोरे,नीलम पंडित,अभिजित मंगल,विजय बोडेकर,सचिन पांडुळे,सुदर्शन लोहाडे,विवेक काशीकर,श्री गायकवाड,कदम ससूनचे वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक अरुण बर्डे उपस्थित होते. प्रारंभी गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले .
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
_________