भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्षपदी प्रिती दिक्षित...
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्षपदी प्रिती दिक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्षपदी प्रिती दिक्षित
कल्याण : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्षपदी प्रिती दिक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा नगरसेविका रेखा चौधरी यांनी हि नियुक्ती केली असून भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव प्रिया शर्मा, महिला जिल्हा सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी, कल्याण शहर महिला सरचिटणीस भावना मनराजा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याआधी प्रिती दिक्षित यांच्याकडे कल्याण शहर युवती अध्यक्षा हि जवाबदारी होती. पक्षाने आपल्यावर सोपवलेली नवीन जवाबदारी योग्य रीतीने पार पाडून पक्ष संघटना वाढीसाठी आणि महिलांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिक्षित यांनी यावेळी सांगितले.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
___________