भाजपाचे महावितरण वाडा कार्यालय समोर वीज बिल होळी आदोंलन...

संपूर्णमहाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या वाढीव वीज बिल विरोधात भाजपा कडून दिवसभर आंदोलन करण्यात आली. वाडा येथील महावितरण कार्यालय समोर दि.२३ नोव्हेंबर रोजी भाजपा वाडा तालूका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीजबील होळी आंदोलन करण्यात आले.

यावेळी मंगेश पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत जनतेला भूलथापा देण्याच काम केलं आहे. करोना काळातील वीज बिल तसेच वाढिव बिल कमी करू हे खोट आश्वासन त्यांनी महाराष्ट्र जनतेला दिल होते. परंतु आता वीजबिल कमी करण्याच्या आश्वासना पासून पळ काढण्याचा प्रयत्न हे महाविकास आघाडी सरकार करत आहे.अश्या सरकारच निषेध म्हणून आणि झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी वीजबिलांची होळी करून आंदोलन करत असल्याचे मंगेश पाटील यांनी सांगितले.

यावेळी भाजप वाडा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करत महावीतरण कार्यालय समोर वीज बिलाची होळी केली.

वाडा

प्रतिनिधी - जयेश घोडविंदे

___________