भाजपाचा नियोजित मोर्चा पोलीस प्रशासनाने लावला उधळून, भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारचा निषेध...

पालघर जिल्ह्यातील विविध समस्यां आणि मागण्यांबाबत भाजपकडून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदर संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

भाजपाचा नियोजित मोर्चा पोलीस प्रशासनाने लावला उधळून, भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारचा निषेध...

पालघर जिल्ह्यातील विविध समस्यां आणि मागण्यांबाबत भाजपकडून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदर संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र जिल्ह्यात जमावबंदी कायदा लागू असल्याने जिल्ह्यातील नाक्यांनाक्यांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना असतील त्याच ठिकाणी स्थानबद्ध करुन अडविल्याने होणारा मोर्चा उधळून लावला आहे. त्यामुळे भाजपाने हा मोर्चा स्थगित करून राज्यातील महाआघाडी सरकारवर ताशेरे ओढत निषेध व्यक्त करून शिष्टमंडळाकडून पालघर जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तदनंतर ताशीष हॉटेलमध्ये ठीक १२ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असता यावेळी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार संजय केळकर यांनी आपले मत मांडताना लोकशाहीने आम्हा दिलेला अधिकार या आघाडी सरकारने हिराऊन घेतल्याचा आरोप करत निषेध व्यक्त केला. तर जिल्हयात भ्रष्टाचाराला पेव भाजपचा आरोप.

डहाणू नगरपंचायतीत कार्यरत मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी भ्रष्टाचार केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तसेच विकासकामांना अडथळे आणण्याचे काम ते करत आहे. त्यांच्यावर अनेकदा चौकशा झाल्या असून ते दोषी असल्याचा अहवाल शासनाकडे गेला आहे. या सर्व बाबतीत पुरावे दिलेले असूनसुद्धा या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. जिल्ह्यात भ्रष्टाचारला पेव आला असून अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांना शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने यावेेळी केला.

कुपोषणात वाढ मात्र राज्य सरकारचे दुर्लक्ष :

पालघर जिल्ह्यात कुपोषणाच्या आकडेवारीत पुन्हा एकदा वाढ झाली असून महाविकास आघाडी सरकार भाजपने तयार केलेल्या योजनांची अमंलबजावणी करत नसल्याने कुपोषणसारख्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यायला हे सरकर कमी पडत असून कुपोषण निर्मूलनासाठी भाजप सरकारने अनेक योजना एकत्र करून प्रशासन सज्ज केले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारकडे कुपोषण सारख्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही असा आरोप भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. 

प्रमुख मागण्या :

१) शेतकऱ्यांना रु. ५० हजार हेक्टरी सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. 

२) भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.
      i) डहाणू नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी 
     ii) पालघर नगरपरिषदेतील भ्रष्टाचार
    iii) वाडा नगरपंचायतमधील भ्रष्टाचार
    iv) विक्रमगड नगरपंचायतमधील भ्रष्टाचार

३) प्रलंबित वनदावेतातडीने मंजूर करावे व वनाधिकाऱ्यांची मुजोरी बंद करा.  

४)  रोजगार हमीचीकामे त्वरित चालू करा.

५) नामांकित शाळामंध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे नवीन प्रवेश त्वरित चालू करा. 

६) जिल्ह्यातील मंजूर रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा व जिल्हापरिषद बांधकाम खाते व सार्वजनिक बांधकामखात्यातील भ्रष्टाचारी अधिकारी व ठेकेदारांचीचौकशी करून कारवाई करा.

७) जिल्हाकृषी अधिकारी कार्यालयामधील भ्रष्टाचाराची चौकशी करा व रब्बी हंगामासाठी बियाणे त्वरित द्या.

८)  वाढीव वीजबिले त्वरित रद्द करा.

९) जिल्ह्यामधील  भात खरेदी केंद्र त्वरित चालू करावेत, शेतकऱ्यांचा सर्व भात खरेदी करावा.

१०) आदिवासी जनतेसाठी खावटी कर्ज त्वरित वाटप करा. 

११) कुपोषण निर्मूलन उपाययोजनेतील भ्रष्टाचार त्वरित थांबवा, बालमृत्यूचे प्रमाण थांबवा.

१२) जिल्यामधील सि. एस.आर. फंडामार्फत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करा.(कोकाकोला कंपनी कुडूस)

१३) जिल्ह्यात सुरु असलेल्या मोठ्या प्रकल्पामध्ये स्थानिक कामगारांची भरती करा ( अदानी प्रकल्प [रिलायन्स], सदभावना दापचरी चेक पोस्ट, कॅप्सूल कंपनी आशागड).

१४) मुंबई तेवडोदरा एक्सप्रेस हायवेमध्ये जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे मोबदला द्या.

१५) डहाणू, तलासरी व पालघर तालुक्यातील भूकंप प्रवणक्षेत्रातील लोकांना भूकंपामुळे झालेली नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

___________