कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मराठवाडा विभागांतर्गत बिड जिल्हा आढावा बैठक संपन्न - सुमित भुईगळ

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मराठवाडा विभागांतर्गत बीड जिल्ह्याची आढावा  बैठक रविवार  दि.18 आँक्टोबर 2020 रोजी मा.व्ही.जी.जाधव राज्य उपाध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली तसेच मा.सुमित भुईगळ विभागीय अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह बीड  येथे संपन्न झाली.  

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मराठवाडा विभागांतर्गत बिड जिल्हा आढावा बैठक संपन्न - सुमित भुईगळ
Bid District Review Meeting of Marathwada Division of Kastrib Employees Federation Concluded - Sumit Bhuigal
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मराठवाडा विभागांतर्गत बिड जिल्हा आढावा बैठक संपन्न - सुमित भुईगळ

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मराठवाडा 
विभागांतर्गत बिड जिल्हा आढावा बैठक संपन्न - सुमित भुईगळ

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मराठवाडा विभागांतर्गत बीड जिल्ह्याची आढावा  बैठक रविवार  दि.18 आँक्टोबर 2020 रोजी मा.व्ही.जी.जाधव राज्य उपाध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली तसेच मा.सुमित भुईगळ विभागीय अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह बीड  येथे संपन्न झाली.  

       या बैठकीत  वनविभागासह  विविध खात्यातील  कर्मचाऱ्यांनी कास्ट्राईब कर्मचारी महासंघात प्रवेश केला.  
    सदर बैठकीत वनविभागातील वनरक्षक व वनपाल यांच्या अडचणी तसेच  बाह्यस्थ यंत्रणेकडून पदभरती (खाजगीकरण) पदोन्नतीतीलआरक्षण,कालबद्ध पदोन्नती,अनुकंपा रिक्त पद,तसेच कर्मचाऱ्यांकडून मांडल्या गेलेल्या प्रश्नावर चर्चा होवून त्यातील काही प्रश्न विभागीय कार्यालय स्तरावर मांडून सोडविण्याचे संघटनेने आश्वासित केले.या प्रसंगी सर्व संमतीने श्री.देविदास गाडेकर यांची कास्ट्राईब वनविभाग कर्मचारी संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.सदर बैठकीस मा.एस.जी. वरवडे,एस.पी.धसे,जी.बी. कस्तुरे,बी.के.सरवदे,डि.एम.मोरे,एम.व्हि.तागड,  श्रीमती सारिका विठ्ठल पाखरे,श्रीमती विजया गेणबा शिंगटे,श्रीमती सोनाली सोपान वनवे, योगेश शेषेराव,बाहेरवाल,रविंद्र प्रल्हाद यादव,ए. एन.तोंडे,ए.बिल्पे,डि.जे. परजने,कल्याण आडे,सि.आर.मुंडे यांच्या सह बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अधिकारी/कर्मचारी यांच्यासह
मनोज कांबळे जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ औरंगाबाद, गोविंद वैद्य,अमोल वाघमारे,संदिप मोरे,संजय भांबळे,विकास अवचार,व प्रकाश सुर्यवंशी,औरंगाबाद सह बीड येथील कास्ट्राईबचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

__________