आंबेडकरी चळवळीतील झुंजारू रिपाइंचे जेष्ठ नेते भिवाभाई तथा भिवाजी लक्ष्मण गायकवाड यांचे दु:खत निधन...

आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते दक्षिण मुंबई जिल्हा माजी मुंबादेवी तालुका अध्यक्ष भिवाभाई तथा भिवाजी लक्ष्मण गायकवाड यांचे दिर्घ आजारात रूहदय विकाराने दु:खत निधन वयाच्या ५७ व्या वर्षी आज पहाटे चार वाजता झाले.

आंबेडकरी चळवळीतील झुंजारू रिपाइंचे जेष्ठ नेते भिवाभाई तथा भिवाजी लक्ष्मण गायकवाड यांचे दु:खत निधन...
Bhivabhai and Bhivaji Laxman Gaikwad, senior leaders of Jhunjaru Ripai in the Ambedkar movement, passed away tragically ...

आंबेडकरी चळवळीतील झुंजारू रिपाइंचे जेष्ठ नेते भिवाभाई तथा भिवाजी लक्ष्मण गायकवाड यांचे दु:खत निधन...

मुंबई-दिनांक२८नोव्हेंबर:रिपाइं(आ)

आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते दक्षिण मुंबई जिल्हा माजी मुंबादेवी तालुका अध्यक्ष भिवाभाई तथा भिवाजी लक्ष्मण गायकवाड यांचे दिर्घ आजारात रूहदय विकाराने दु:खत निधन वयाच्या ५७ व्या वर्षी आज पहाटे चार वाजता झाले. ते नामदार रामदास आठवले साहेबांचे पॅथर चळवळी पासूनचे अंगरक्षक व अंत्यत विश्वासू मनमिळाऊ सक्रिय कार्यकर्ते होते,त्यांनी पॅथर नेते भाई कदम व  सो ना कांबळे, गणेश साळवे यांच्या समवेत दक्षिण मुंबई विभागात मुंबादेवी तालुका अध्यक्ष पदावरून  भिवाभाई गायकवाड यांनी रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली कौतुकास्पद कामगिरी केली असल्याचे रिपाइंचे समाजभूषण सो ना कांबळे उपाध्यक्ष मुंबई प्रदेश यांनी मरीन लाइनस चंदनवाडी स्मशान भूमि येथे अंत्यसंस्कार विधी वेळी भावुक उद्गगार काढले.

भिवाभाई गायकवाड यांच्या पच्छात पत्नी गीतांजली, मुलगा-करण, मुलगी-प्रिंयका,भाऊ- शंकर, समीदर,शिवाजी,बहिणी- सौ चंद्रभागा मारूती शिंदे,सौ सुशिला अशोक साळवे असा मोठा परिवार आहे अंत्य यात्रा धोबी तलाव मेट्रो  ते चंदनवाडी स्मशान  येथे कोरोना लाॅकडाउनचे नियम पाळून रिपाइं मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सो ना कांबळे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष रवीभाऊ तांबे, शांताराम बागुल एस टी एस सी ओ बी सी बॅंक संघटना कार्याध्यक्ष ,म न से श्री  दिपक ओझा, शिवसेना श्री बंडू नांदेकर,समता सैनिक दल - सुनिल बेडे, अरूण भालेराव,हरी पुरबिया वाल्मिकी समाज कार्यकर्ते, महमद गफार खाॅन,सखाराम केदारे,प्रंशात सांवत,श्याम आसुळकर,संजय साळवे,सचिन जाधव, आदी मान्यवर विविध पक्ष संघटनेचे बहुसंख्य  उपस्थित होते.

कालकथित दिवंगत भिवाभाई तथा भिवाजी लक्षण गायकवाड यांचा जलदान विधी व पुण्यानुमोदन अभिवादन सभा दिनांक ०६ डिसेंबर २०२० रोजी रविवार  सकाळी ११.०० वाजता त्यांच्या राहत्या घरी मेट्रो धोबीतलाव मरीन लाइन्स चर्च, फिस मार्केट जवळ कोरोना महामारीचे सर्व सरकारी नियमांचे पालन करून  आयोजन करण्यात आल्याचे त्यांचे बंधू शिवाजी लक्ष्मण गायकवाड यांनी जाहीर केल्याचे रिपाइं समाजभूषण  सो ना कांबळे उपाध्यक्ष मुंबई प्रदेश (आठवले) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

आपला विनित
रिपाइंचे समाजभूषण  सो ना कांबळे उपाध्यक्ष मुंबई प्रदेश (आठवले)
मो. ९७०२९९२६२६

मुंबई

प्रतिनिधी - संजय बोर्डे

___________