समता,न्याय,बंधुता करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द धम्म स्विकारला - भिक्खु धम्मशील
भुतलावर प्रथमत: धम्मचक्र प्रवर्तन हे तथागत भगवान गौतम बुध्दांनी घडवून आणले आणि त्यांच्या पच्छात त्यांच्या मानव कल्याणकारी विचाराचा स्विकार करुण अनेकदा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन घडून आले.

समता,न्याय,बंधुता करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द धम्म स्विकारला - भिक्खु धम्मशील
भुतलावर प्रथमत: धम्मचक्र प्रवर्तन हे तथागत भगवान गौतम बुध्दांनी घडवून आणले आणि त्यांच्या पच्छात त्यांच्या मानव कल्याणकारी विचाराचा स्विकार करुण अनेकदा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन घडून आले. इतिहास कालीन वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या धर्माला राजअश्रय मिळाला मात्र बुध्द धम्म वगळता एकाही धर्माच्या राजाश्रय कालखंडात मानव सुखी व समाधानी राहू शकला नाही. मानवाच्या कल्याणकारी कार्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले कार्य पणाला लावले परंतू त्यांच्याही कार्यकाळात पुर्णत: समाजाच्या बदलाचे कार्य घडले नाही. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अगदी बालपणापासून अन्यायाची चटके सहन करावे लागल्याने अन्यायाची चिड आली आणि समाज परिवर्तनाचे विचार अंगीकारुन कबीर, फुले, शाहुंच्या विचाराचा वारसा जपून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द धम्मचा व तत्वज्ञानाचा 14 ऑक्टोबर 1956 साली लाखो जनतेबरोबर स्विकार केला. प्रेम, दया, आपुलकी,प्रज्ञा, शिल,करुणा या मानव कल्याणासाठी असणा·या सुयोग्य विचारांचा संग्रह पाहून समता न्याय, बंधुता या गोष्टी मिळवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द धम्माचा स्विकार केला. असे मत भिक्खु धम्मशील यांनी धम्मदेसना देताना व्यक्त केले.
सम्यक संकल्प फेसबुक लाईव्ह प्रक्षेपित 64 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन तथा भिक्खु धम्मशिल यांचा आठव्या वर्षावास समापना निमित्त दहा दिवशीय ऑनलाईन धम्मदेसना कार्यक्रमाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करत होते.
सम्यक संकल्प समता पर्व च्या माध्यमातून कोरोना महामारीच्या काळात समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेतले आणि महापुरुषांच्या जयंती / पुण्य स्मरणानिमित्ताने व वेगवेगळ्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य सातत्य पुर्वक केले गेले व आज तागायत करत आहेत. मागील चार दिवसांपासून भिक्खु धम्मशील यांच्या आठव्या वर्षावास समापना निमित्त दहा दिवशीय ऑनलाईन धम्मदेसना कार्यक्रम सुरु असून पुढील काळात दि.04 नोव्हेंबर 2020 पर्यंत सम्यक संकल्प फेसबुक लाईव्ह पेज वरून रोज सायंकाळी 07:00 वा. ऑनलाईन धम्मदेसना सुरु राहणार आहे.
तरी प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था बीड व सर्व संचालक मंडळ व सभासद यांच्या वतीने या धम्मदेसना कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्व जनतेस व उपासक - उपासिका यांना करण्यात आले आहे.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
_________