पॅंथरचा इतिहास सांगणारा मुरबाड चा ढाण्या वाघ हरपला...| भाऊसाहेब उर्फ अण्णा काळाच्या पडद्याआड...

मुरबाड तालुक्याचा ढाण्या वाघ म्हणून अशी त्यांची ओळख होती ते सर्वसामान्यांचे कैवारी लोकनेते दीनदुबळ्यांचा आधार भाऊसाहेब देसले उर्फ अण्णा हे नुसतं नाव नसून जनसामान्य जनतेचा बुलंद आवाज होते सर्व जातीधर्माचे लोकांच्या आशेचे किरण होते आज ०२ नोव्हेंबर रोजी आपल्या प्रदीर्घ आजाराशी झुंज देत अखेर वयाच्या ७२ वर्षी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या या जाण्याने आंबेडकरी जनतेची व आरपीआय पक्षाची मोठी हानी झाली आहे. 

पॅंथरचा इतिहास सांगणारा मुरबाड चा ढाण्या वाघ हरपला...| भाऊसाहेब उर्फ अण्णा काळाच्या पडद्याआड...
Murbad's Dhanya tiger, which tells the history of Panther, is lost Bhausaheb alias Anna behind the curtain of time ...
पॅंथरचा इतिहास सांगणारा मुरबाड चा ढाण्या वाघ हरपला...| भाऊसाहेब उर्फ अण्णा काळाच्या पडद्याआड...

पॅंथरचा इतिहास सांगणारा मुरबाड चा ढाण्या वाघ हरपला

भाऊसाहेब उर्फ अण्णा काळाच्या पडद्याआड...

 मुरबाड तालुक्याचा ढाण्या वाघ म्हणून अशी त्यांची ओळख होती ते सर्वसामान्यांचे कैवारी लोकनेते दीनदुबळ्यांचा आधार भाऊसाहेब देसले उर्फ अण्णा हे नुसतं नाव नसून जनसामान्य जनतेचा बुलंद आवाज होते सर्व जातीधर्माचे लोकांच्या आशेचे किरण होते आज ०२ नोव्हेंबर रोजी आपल्या प्रदीर्घ आजाराशी झुंज देत अखेर वयाच्या ७२ वर्षी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या या जाण्याने आंबेडकरी जनतेची व आरपीआय पक्षाची मोठी हानी झाली आहे. 

अशा लोकनेत्याचा जन्म १३ फेब्रुवारी १९५१ साली  मुरबाड येते आंबेडकरनगर मध्ये झाला आण्णा लहानपणापासून अतिशय हुशार अन् संयमी व्यक्तीमहत्व त्यांचे शिक्षण भिंवडी येथे वस्तीगृहात १०वी पर्यंत  झाले लहानपणापासून सामाजिक काम करण्याची आवड होती अनेक मोर्चे,आंदोलने मध्ये आण्णा सहभागी असायचे १९८०पासुन डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा संघर्ष सुरू केला अन् त्या संघर्षाला खरा यश १९८६ला आले,त्या संघर्षात तालुक्यातुन अनेक आंबेडकरी जनतेनी तन मन धनाने पुढाकार घेतला अन् त्या संघर्षातुनच आण्णांची राजकिय वाटचाल सुरू झाली  डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष व  तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेनी एकमताने भाऊसाहेब देसले यांना रिपाइं मुरबाड तालुक्याच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

२० वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले व १२ वर्ष पंचायत समिती सदस्य व त्यांची पत्नी  सुनंदाताई भाऊसाहेब देसले या हि मूरबाड तालुक्यातील जि.प.सदस्या मध्ये सर्वात जास्त मताने निवडून आल्या  हि खरी आण्णांची जन सामान्यांसाठी केलेल्या कामाची पोचपावती होती अनेक कार्यकर्ते आण्णानी घडवले व त्यांना रोजगार उपलब्ध करून दिले अनेक शिक्षक वर्ग आण्णांसोबत खांद्याला खांदा लावून काम करायचे आपल्या नोकरीची पर्वा पण नसायची  असे कार्यकर्ते घडवले.  सर्व एकमताने आण्णांचा निर्णय मान्य करायचे, तालुक्यातील जाती धर्माच्या लोकांना विविध समस्यांवर न्याय देण्याचे काम करुन जातीय सलोखा निर्भीडपणे  जोपासायचे  ग्रामपंचायत सदस्य असताना सर्व कामे आण्णांच्या सल्ल्याने व्हायची  असा तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका नेता मुरबाड तालुक्यातील दिन दुबल्यांचा आधारस्तंभ आज दि०२/११/२०२० अखेरचा निरोप घेतला त्यांच्या या अंत्ययात्रेत ठाणे जिल्ह्यासह मुरबाड तालुक्यातील  समस्त आंबेडकरी जनता आरपीआय ज्येष्ठ कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी पत्रकार  पोलीस राजकीय कार्यकर्ते अंत्ययात्रेत सामील झाले होते तरी त्यांचा पुण्यानुमोदन चा कार्यक्रम बुधवार दिनांक ११ /११/२०२० रोजी त्यांच्या राहत्या घरी तोंडलीकर नगर येथे होईल याची सर्व आंबेडकरी जनतेने नोंद घ्यावी असे आवाहन देसले परिवारा कडून करण्यात आले आहे अश्या लोकनेत्याला पवार कुटुंबियांकडून व महाराष्ट्र गनिमी कावा  पोर्टल न्यूज च्या वतीने भावपूर्ण  आदरांजली वाहण्यात येत आहे.

गनिमी कावा संपादकीय न्यूज 

मुरबाड

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार

_________