अभिवादन ग्रुपच्या वतीने महामानवांना दररोज विनम्र अभिवादन अभियान...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दररोज नियमित पुष्पहार अर्पण आणि अभिवादन या संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श ठरणाऱ्या उपक्रमाला दिनांक 20/12/2020 रोजी एक वर्ष झाले आहे

अभिवादन ग्रुपच्या वतीने महामानवांना दररोज विनम्र अभिवादन अभियान...
बीड दि.०५ :- डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना दररोज नियमित पुष्पहार अर्पण आणि अभिवादन या संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श ठरणाऱ्या उपक्रमाला दिनांक 20/12/2020 रोजी एक वर्ष झाले आहे.मागील वर्षी दिनांक 20/12/2019 संत गाडगेबाबा स्मृती दिनी संत गाडगेबाबांना समाजसेवकांनी अभिवादन केले व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना देखील अभिवादन करण्यासाठी गेले असता प्रा.अशोक गायकवाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दररोज पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याची संकल्पना मांडली व सर्वांनी त्यास अनुमती दर्शवली त्यातुन महामानव अभिवादन ग्रुपची स्थापना होऊन त्यांच्या माध्यमातून आजतागायत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दररोज निरंतर पुष्पहार आणि अभिवादन कार्यक्रम चालू आहे.
डॉ.बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर जी ऊर्जा आणि समाज कार्याची प्रेरणा मिळते त्यातुन अभिवादन ग्रुपच्या माध्यमातून 50 मरणोत्तर देहदान,माता रमाई जयंती मध्ये 25 रक्तदान,आदिवासी समीकरण येथे आदिवासी मुलांसाठी तीस हजार रुपयाची एक रूम बांधून दिली,राजगृह बुद्ध विहार येथे निराधार महिलेला आर्थिक मदत,भन्तेना दान,कोरोना महामारीच्या काळात 160 गरजूंना अन्नधान्य किट वाटप,गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप असे अनेक समाजोपयोगी कार्य केले आहे.
या वर्षभरात प्रा.नामदेव शिनगारे,सुग्रीव गायकवाड, सुभाष भादवे,बी.एम गायकवाड,जेलर कांबळे,रवींद्र गोदाम,संगीता वाघमारे,अलकाताई डोंगरे,उजगरे बापू, डॉ.शिवाजी दिवान,सुधाकर विद्यागर,भाकर सरपते, वसंत तरकसे,यशवंत कदम,गुंजाळ सर, रावसाहेब चक्रे,एस.टी गायकवाड,तुकाराम जावळे,मंदा मस्के प्रभावती रोडे,सुनिता चव्हाण,शिला वाघमारे,रत्नप्रभा भंडारे,शिवाजी राजगुरे,केदार पद्माकर,सौदागर,जाधव सखाराम उजगरे,केशव आठवले,जोगदंड इत्यादींनी योगदान दिले आहे.
दि.20/12/2020 पासून अभिवादन ग्रुपने संकल्प करून पुढील महामानव व महामातांच्या पुतळयाला नियमितपणे पुष्पहार आणि अभिवादन करण्याची कायमस्वरूपी जबाबदारी स्विकारली आहे यामध्ये माँ.जिजाऊ- राजु भोले, छत्रपती शिवाजी महाराज- पंचशीला सरपते, संत बसवेश्वर- प्रशांत वासनिक,संत गाडगेबाबा- डी.जी वानखडे, महात्मा फुले- गुलाबराव भोले, सावित्रीबाई फुले- कॅ.राजाभाऊ आठवले, अहिल्यादेवी होळकर- प्रा.अशोक गायकवाड, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे- ए.एल औसारमल,नितीन गालफाडे,बाबुराव गालफाडे.
महामानवांच्या अभिवादन अभियानाला जनतेमधुन खुप चांगला प्रतिसाद मिळेत आहे व एक सामाजिक बांधीलकी जोपासली जात आहे असा सूर जनते मधून येत आहे.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
___________