नाळवंडी नाका येथे रस्त्यासाठी मड-गाडो आंदोलन करणार- संदीप जाधव, बीड

बलभीम नगर मार्गे शास्त्रीनगर कडे जाणाऱ्या नाळवंडी नाका रस्ता खड्डेमय... लोकप्रतिनिधींच जाणून-बुजून रस्त्याकडे दुर्लक्ष...

नाळवंडी नाका येथे रस्त्यासाठी मड-गाडो आंदोलन करणार- संदीप जाधव, बीड
Mud-Gado agitation for road at Nalwandi Naka - Sandeep Jadhav, Beed

नाळवंडी नाका येथे रस्त्यासाठी मड-गाडो आंदोलन करणार-संदीप जाधव बीड


बीड: बलभीम नगर मार्गे शास्त्रीनगर कडे जाणाऱ्या नाळवंडी नाका रस्ता अतिशय खराब झाला असून लोकप्रतिनिधी जाणून-बुजून या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. गेल्या काही वर्षापासून हा रस्ता खड्डेमय झाला असून रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. अबालवृद्धांना तसेच वाहनधारकांना या रस्त्याने येताना जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच मयत व्यक्तीस अंत्यविधीला घेऊन जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी येथील लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप जनप्रहार सामाजिक संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष संदीप जाधव यांनी केला आहे.

तसेच येणाऱ्या काळात नगर परिषद निवडणुकांमध्ये नगर अध्यक्षांसह नगरसेवकांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. सदरील रस्ता आठ दिवसाच्या आत दुरुस्त न झाल्यास जनप्रहार सामाजिक संघटनेच्यावतीने बीड नगराध्यक्षां सह स्थानिक वॉर्ड मेंबरच्या विरोधात नाळवंडी नाका येथे नगर परिषदेच्या विरोधात मड गाडो आंदोलन करण्याचा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जनप्रहार सामाजिक संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष संदीप जाधव यांनी दिला आहे.

 बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

_______