जनतेच्या मूलभूत हक्कासाठी लढणारे पत्रकार संजय बोर्डे यांना जीवे मारण्याचे षडयंत्र मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक. आयुक्त, उपायुक्त यांच्याकडे यांच्या कडे केली मागणी ... संजय बोर्डे

वनविभागाच्या हद्दीतील अवैध्य धंदे काळाबाजार, नकली पावत्या, शासनाची फसवणूक, महसूल चोरी, सार्वजनिक मालमत्तेेची चोरी, मोकळ्या भूखंडावर अनधिकृत  झोपड्या बसवणे, हफ्ते वसुली करणे, याचे खूप मोठे रॅकेट उघड केल्याने फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे पत्रकार व महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांच्या विरोधात जीवे मारण्याचे षडयंत्र करणाऱ्यावर शासन निर्णय गृह विभाग अन्वये कायदेशीर कारवाई करून पोलीस संरक्षणाची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब गृहमंत्री अनिल देशमुख पोलीस, महासंचालक महाराष्ट्र राज्य,पोलीस आयुक्त मुंबई ,पोलीस उपायुक्त परी १२ यांच्याकडे करण्यात आली आहे.

जनतेच्या मूलभूत हक्कासाठी लढणारे पत्रकार संजय बोर्डे यांना जीवे मारण्याचे षडयंत्र मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक. आयुक्त, उपायुक्त यांच्याकडे यांच्या कडे केली मागणी ... संजय बोर्डे
Conspiracy to assassinate journalist Sanjay Borde, who is fighting for the basic rights of the people, Chief Minister, Home Minister, Director General of Police. Demand made to the Commissioner, Deputy Commissioner ... Sanjay Borde

जनतेच्या मूलभूत हक्कासाठी लढणारे पत्रकार संजय बोर्डे यांना जीवे मारण्याचे षडयंत्र मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक. आयुक्त, उपायुक्त यांच्याकडे यांच्या कडे केली मागणी ... संजय बोर्डे

   मुंबई : वनविभागाच्या हद्दीतील अवैध्य धंदे काळाबाजार, नकली पावत्या, शासनाची फसवणूक, महसूल चोरी, सार्वजनिक मालमत्तेेची चोरी, मोकळ्या भूखंडावर अनधिकृत  झोपड्या बसवणे, हफ्ते वसुली करणे, याचे खूप मोठे रॅकेट उघड केल्याने फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे पत्रकार व महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांच्या विरोधात जीवे मारण्याचे षडयंत्र करणाऱ्यावर शासन निर्णय गृह विभाग अन्वये कायदेशीर कारवाई करून पोलीस संरक्षणाची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब गृहमंत्री अनिल देशमुख पोलीस, महासंचालक महाराष्ट्र राज्य,पोलीस आयुक्त मुंबई ,पोलीस उपायुक्त परी १२ यांच्याकडे करण्यात आली आहे.

संजय बोर्डे हे कांदिवली पूर्व मुंबई येथील एक पत्रकार व प्रतिष्ठित नागरिक तसेच समाजसेवक आहेत.वनविभागाच्या परिसरात गेली २० वर्षापासून ते राहत असून. नागरिकांना लागणाऱ्या प्राथमिक सुविधा जसे वीज पाणी शौचालय रस्ते गटार या साठी अहोरात्र प्रयत्न करत असतात. नगरसेवक, आमदार ,खासदार, वनमंत्री मुख्यमंत्री ,जिल्हाधिकारी अधिकारी यांना वारंवार पत्रव्यवहार करून मागणी करत असतात.

 मानवाचे जीवन मान उंचावण्यासाठी व नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न करत असतात.त्यासोबत वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल, यूट्यूब चैनल ,यावर् सुद्धा  झोपडपट्टीच्या बातम्या लावत असतात तसेच प्राथमिक सुविधा मिळाव्यात म्हणून सदैव प्रयत्नशील असतात.

 वनविभागाच्या परिसरात राहणारे सर्व समाज बांधव यांच्या सोबत ते कार्यरत असतात व वेळोवेळी प्रशासनास मदत करत असतात. परंतु या विभागात अनधिकृतपणे वीज चोरी करणारे, पाणी चोरी करणारे, अनधिकृत डुकरे पाळणारे,दारू विकणारे, मोकळ्या जागेवर अनधिकृत झोपड्या बांधणारे, अनधिकृत पार्किंग चालवणारे, जुगाराचा अड्डा चालवणारे ,बबलू चंडालिया, राकेश चवाथे व त्यांचे पंटर नादेर ,विशाल जाधव , लालू,सिद्धू व इतर सहकारी,त्यांना अभय देणारे पठाण शेख व इतर व भ्रष्टाचारी वनशिपाई अंकुश पवार यांनी दिनांक २६ ऑक्टोंबर २०२० रोजी वनविभाग चौकी गौतम नगर लहुगड याठिकाणी ५०० ते ६०० लोकांचा बेकायदेशीर जमाव जमवला व कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला तसेच संजय बोर्डे यांच्या जिवास धोका निर्माण होईल असे कृत्य केले यास काही राजकीय लोकांचा वरदहस्त असल्याने या लोकांचे मनोबल वाढले आहे.अगोदर सुद्धा या विरोधात संजय बोर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु काहीही कारवाई झालेली नाही.

तसेच दि.०४ नोव्हेंबर २०२० रोजी संजय बोर्डे यांच्या विरोधात गुप्त बैठक लावून जिवास धोका निर्माण होईल असा कट कारस्थान केले आहे.त्यामुळे या लोकांमुळे संजय बोर्डे व त्यांच्या परिवाराच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. संजय बोर्डे व त्यांचा परिवार भयभीत झाला आहे हे लोक कधीही प्राणघातक हल्ला करून खून करण्याची शक्यता आहे.या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी यांच्या अनधिकृत धंद्याची चौकशी करावी व संजय बोर्डे यांना त्वरित पोलीस संरक्षण देण्यात यावे.
 
यासाठी मा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा, अनिल देशमुख गृहमंत्री महाराष्ट्र राज्य,अप्पर पोलिस महासंचालक(का व सु) महाराष्ट्र राज्य,पोलिस आयुक्त मुंबई,अतिरिक्त पोलिस आयुक्त ठाकूर गाव,पोलिस उपायुक्त परी १२ वरिष्ठ पोलीस निरीक्षक समतानगर मुंबई यांच्याकडे महाराष्ट्र  शासन गृहविभाग निर्णय क्रमांक सीआरटी 2012/प्र.क्र.696/पोल 11 व इतर निर्णय परिपत्रक कायद्याअन्वये मागणी केली आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

_________