भारतातील अयोध्या बनावट , खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे ; प्रभू राम भारतीय नव्हते,ते नेपाळी होते असा केपी शर्मा ओली यांचा दावा.......!!

भारतानं सांस्कृतिक अतिक्रमण करून बनावट अयोध्या निर्माण केली. खरीखुरी अयोध्या नेपाळमध्ये आहे. प्रभू राम भारतीय नसून ते नेपाळी आहेत, असा दावा केपी शर्मा ओली यांनी केला.

भारतातील अयोध्या बनावट , खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे ; प्रभू राम भारतीय नव्हते,ते नेपाळी होते असा केपी शर्मा ओली यांचा दावा.......!!

भारतातील अयोध्या बनावट , खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे ; प्रभू राम भारतीय नव्हते,ते नेपाळी होते असा केपी शर्मा ओली यांचा दावा.......!!

काठमांडू : राजकीय संकटात सापडल्यानं खुर्ची जाण्याची भीती असलेले नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आता भारतावर निशाणा साधला आहे. भारतानं सांस्कृतिक अतिक्रमण करून बनावट अयोध्या निर्माण केली. खरीखुरी अयोध्या नेपाळमध्ये आहे. प्रभू राम भारतीय नसून ते नेपाळी आहेत, असा दावादेखील केपी शर्मा ओली यांनी केला. आपल्याला पंतप्रधान पदावरून दूर करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप याआधी केपी शर्मा ओली यांनी केला होता.

गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं भारतविरोधी भूमिका घेणारे केपी शर्मा ओली सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांचं पंतप्रधानपद धोक्यात आहे. ते टिकवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता त्यांनी थेट भारतावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. नेपाळवर सांस्कृतिक अत्याचार करण्यात आले. ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आली, असं केपी शर्मा ओली कवी भानुभक्त आचार्य जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात म्हणाले.

राजपुत्र असलेल्या रामाला आम्ही सीता दिली, असं आम्ही आजही मानतो. मात्र आम्ही भारतात असलेल्या अयोध्येच्या राजकुमाराला सीता दिली नाही. अयोध्या नावाचं गाव बीरगंजच्या पश्चिमेला आहे. मात्र भारतातील अयोध्या खरीखुरी नाही, असा दावादेखील केपी शर्मा ओली यांनी केली. भारतातील अयोध्या खरी असेल तर मग तिथला राजकुमार लग्नासाठी जनकपूरला कसा येऊ शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विज्ञान आणि ज्ञानाची उत्पत्ती आणि विकास नेपाळमध्ये झाल्याचा दावाही त्यांनी केला.

केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी
नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित केल्यानंतर आता केपी शर्मा ओली एक अध्यादेश आणून पक्षच फोडतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.