औरंगाबाद शहर पोलीसांना पाहिजे असलेला कुख्यात आरोपी नेकनूर पोलीसांनी केला जेरबंद...

पोलीस नाईक /1749 समाधान धारलिंग खराडे नेमणुक केज पोलीस ठाणे हे दि.08-12-2020 रोजी दुपारी 13:30 वाजेच्या सुमारास त्यांच्या मित्रासोबत खाजगी कामानिमीत्त कारमधून बीड ला जात असतांना येलंबघाट गावाच्या जवळ पूलाजवळ त्यांच्या कारला एका बुलेट गाडीवरील दोन इसमांनी गाडी आडवी लावून त्यांची कार थांबवून त्यांना मारहाण करून चाकू दाखवून समाधान खराडे यांच्या हातातील टायटन घड्याळ,विवो कंपनीचा मोबाईल बळजबरीने काढुन घेतला आणि मोबाईल पे मधून 1,00,000 रु. हस्तांतरीत कर असे धमकावत असतांना पाठीमागून आजून एक पल्सर गाडी त्या ठिकाणी आली. त्यावरील आणखी दोन इसमानी खराडे व त्याचे मित्र यांना मारहाण केली. सदर घटना घडत असतांना तेथून जात असलेले विधी अधिकारी कोठावले यांनी फोन करून सदर घटनेची नेकनूर पोलीस ठाणे यांना माहिती दिली.

औरंगाबाद शहर पोलीसांना पाहिजे असलेला कुख्यात आरोपी नेकनूर पोलीसांनी केला जेरबंद...
The notorious accused wanted by Aurangabad city police was arrested by Neknur police ...
औरंगाबाद शहर पोलीसांना पाहिजे असलेला कुख्यात आरोपी नेकनूर पोलीसांनी केला जेरबंद...
औरंगाबाद शहर पोलीसांना पाहिजे असलेला कुख्यात आरोपी नेकनूर पोलीसांनी केला जेरबंद...

औरंगाबाद शहर पोलीसांना पाहिजे असलेला कुख्यात आरोपी नेकनूर पोलीसांनी केला जेरबंद...

पोलीस नाईक /1749 समाधान धारलिंग खराडे नेमणुक केज पोलीस ठाणे हे दि.08-12-2020 रोजी दुपारी 13:30 वाजेच्या सुमारास त्यांच्या मित्रासोबत खाजगी कामानिमीत्त कारमधून बीड ला जात असतांना येलंबघाट गावाच्या जवळ पूलाजवळ त्यांच्या कारला एका बुलेट गाडीवरील दोन इसमांनी गाडी आडवी लावून त्यांची कार थांबवून त्यांना मारहाण करून चाकू दाखवून समाधान खराडे यांच्या हातातील टायटन घड्याळ,विवो कंपनीचा मोबाईल बळजबरीने काढुन घेतला आणि मोबाईल पे मधून 1,00,000 रु. हस्तांतरीत कर असे धमकावत असतांना पाठीमागून आजून एक पल्सर गाडी त्या ठिकाणी आली. त्यावरील आणखी दोन इसमानी खराडे व त्याचे मित्र यांना मारहाण केली.

सदर घटना घडत असतांना तेथून जात असलेले विधी अधिकारी कोठावले यांनी फोन करून सदर घटनेची नेकनूर पोलीस ठाणे यांना माहिती दिली. त्यामुळे नेकनूर पोलीस तात्काळ घटनास्थळी आले. त्यानंतर पोलीसांनी व रोडवरून जाणारे येणारे इसम यांनी त्या चार इसमांना ताब्यात घेतले. त्याची नावे 1. मोहम्मद इम्रान मोहम्मद लतीफ वय 22 वर्ष रा.औरंगाबाद, 2. मोहम्मद फैजल मोहम्मद आयाज वय 20 वर्ष रा.औरंगाबाद 3. शेख अहमद शेख मकबुल वय 29 वर्ष रा. गुलबर्गा 4. मोहम्मद सद्दाम मोहम्मद गाम्मध वय 28 वर्ष रा. गुलबर्गा, यांना पोलीस ठाणे नेकनूर येथे आणून समाधान खराडे यांच्या फिर्यादीवरुन नमुद 4 इसमांविरुध्द कलम 394,341,34 भांदवि प्रमाणे तसेच सह कलम 3,25 भा. ह.का प्रमाणे गुन्हा दाखल केला.

तसेच नमूृद इसमांकडील 02 लोखंडी फायटर चाकू, एक लोखंडी कर्ती,एक स्टिल बटनचा चाकू, एक दातऱ्या व धार असलेला चाकू, एक स्टिलची टोक असलेली अंगठी, व मोबाईल तसेच त्यांनी वापरलेल्या 02 मोटारसायकली गुन्ह्यात जप्त केल्या आहेत.

नमूद आरोपितांकडे कडक चौकशी केली असता त्यांच्यातील मोहम्मद इम्रान मोहम्मद लतीफ वय 22 वर्ष रा. शहा बाजार माशा अल्ला बिल्डींग औरंगाबाद यांच्या विरूध्द मा.पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर यांचे आदेश क्र.2019/ MPDA/ DET 9/CB-119,120,121,122 दि.23-12-2019 अन्वये स्थानबध्द करण्याचे आदेश पारित इ लेले आहेत. तेव्हापासून नमुद आरोपी फरार असून मा.प्रथम वर्ग कोर्ट 2 औरंगाबाद कलम 82 CRPC प्रमाणे जाहीरनामा प्रसिध्द केलेला आहे.

नमूद आरोपी विरूध्द पोलीस ठाणे जिन्सी येथे,खून, पोस्को कायदा, जिवे मारण्याचा प्रयत्न, भा.ह.का,शासकीय कामात अडथळा,अशा गंभीर स्वरूपाचे 9 गुन्हे दाखल आहेत.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

___________