आधार सामाजिक विकास संस्थेच्या वतीने आळजापूर जि. प. शाळेस शालेय साहित्य वाटप...
आळजापूर येथील आधार सामाजिक विकास संस्था या संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद शाळेस शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

आधार सामाजिक विकास संस्थेच्या वतीने आळजापूर जि. प. शाळेस शालेय साहित्य वाटप...
आळजापूर ( ता.फलटण जि. सातारा) येथील आधार सामाजिक विकास संस्था या संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद शाळेस शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या मध्ये व्हाईट बोर्ड,पहिली ते सातवी या वर्गासाठी स्केचबुक तसेच त्या साठी लागणारे मार्कर पेन डस्टर असे 20,000 रुपये किमतीचे साहित्य वितरण करण्यात आले आहे. संस्था सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिली असून संस्थेचे सामाजिक कार्य अत्यंत महत्वाचे आहे . युवकांनी एकत्रित येऊन सामाजिक कार्याचा वसा जोपण्याचे काम अविरत सुरू ठेवले आहे.
या कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष ,आप्पा साहेब नलवडे, मुख्याध्यापक, विजय कदम, मछिद्र बोबडे ,माजी मुख्यध्यापक कृष्णात कुंभार, रामराजे युवा मंच अध्यक्ष शुभम नलवडे, आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ,सुनील नलवडे, संचालक,धोंडिबा कारंडे, मल्हारी जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा
प्रतिनिधी - उमेश चव्हाण
__________