फरारी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील ४२ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...| पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई...

पुणे ग्रामीण लोणीकंद पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या फसवणुकीचा गुन्ह्या संदर्भात माननीय पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गोपनीय माहिती काढणेकामी व पुढील तपासाच्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी कक्षाला आदेश दिले होते.

फरारी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील ४२ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...| पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई...
The fugitive accused was taken into custody and Rs 42 lakh 81 thousand was seized from him...| Action of Pune Rural Anti-Terrorism Cell ...
फरारी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील ४२ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...| पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई...

फरारी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील ४२ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...

पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई...

पुणे ग्रामीण लोणीकंद पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या फसवणुकीचा गुन्ह्या संदर्भात माननीय पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गोपनीय माहिती काढणेकामी व पुढील तपासाच्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी कक्षाला आदेश दिले होते. त्यानुसार दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह अहमदनगर येथे दाखल असताना पथकातील किरण कुसाळकर व महेंद्र कोरवी यांना मिळालेल्या गोपनीय माहिती च्या द्वारे या गुन्ह्यातील गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी असलेला आरोपी सुरेंद्र कुमार सेन राहणार वाघोली पुणे याला अहमदनगर येथून ताब्यात घेऊन गुन्ह्यांमधील साड्या कपडे ड्रेस मटेरियल इत्यादी प्रकारचा एकूण ४२ लाख ८१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला आहे.

सदर कारवाई  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली सई भोरे-पाटील , पोलीस निरीक्षक  पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर  लोणीकंद पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष चे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक फौजदार जितेंद्र शेवाळे, रज्जाक शेख,राजेश पवार, सुनील ढगारे, विश्वास खरात पोलीस हवालदार  राजेंद्र मिरगे, ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण  कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत, अरुण पवार या पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष पथकाने  केली.

बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

_________