वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर पालिका प्रशासन आणि वाहतूक विभागाची कारवाई...

रस्त्यालगत वर्षानुवर्षे उभ्या असलेल्या वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि शहराला अवकळा आणणाऱ्या वाहनांवर पालिका प्रशासन आणि वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे.

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर पालिका प्रशासन आणि वाहतूक विभागाची कारवाई...

कल्याण : रस्त्यालगत वर्षानुवर्षे उभ्या असलेल्या वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि शहराला अवकळा आणणाऱ्या वाहनांवर पालिका प्रशासन आणि वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे. हि वाहने जप्त करण्यास पालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसाच्या मदतीने सुरुवात केली असून हि वाहने सोडविण्यासाठी वाहन चालकांना  दंड भरावा लागणार आहे.

रस्त्याच्या कडेला वाहतूक कोंडीत भर घालत वर्षानुवर्षे वाहने उभी असून यामुळे शहराला अवकळा आली आहे. शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाला देखील या धूळ खात पडलेल्या वाहनाचे ग्रहण लागले असून शहरातील रस्त्याच्या कडेला धूळ खात पडलेली बेवारस वाहने हटवून रस्ता स्वच्छ आणि वाहतुकीसाठी मोकळा करण्याची मागणी नागरिकाकडून होत होती.

पालिका प्रशासनाने आज वाहतूक पोलिसाच्या मदतीने कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत  रोडलगतच्या  बेवारस वाहनावर नोटिसा लावत कारवाई केली.  हि कारवाई सुरु राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________