एम एच 05 डी एच 5552 मध्य धुंद वॅगनार ने तीन आदिवासी निरपराध बांधवांना चिरडून फरार...| आदिवासी समाजसेविका कविता निरगुडे यांनी केली ठाणे ग्रामीण एसपीकडे तक्रार...

आदिवासी समाजातील आदि.कृष्णा गोपाळ मेंगाळ,वय वर्ष-२४,आदि.पांडुरंग रामा उघडा,वय वर्ष-३५,सर्व राहणार गुंबाळवाडी,पो.पाटगाव,ता. मुरबाड,जि.ठाणे,हे शेजारीच असलेल्या मोहघर या ठिकाणी काही कामानिमित्त जावावयास निघाले होतें.दरम्यान मोहघर फाटा येथे आदि.किरण काशिनाथ उघडा,वय वर्ष-१६ हा भेटला. दरम्यान रस्त्याच्या कडेला गाडी लावून आदि.कृष्णा गोपाळ मेंगाळ,व आदि.पांडुरंग राघो उघडा,हे आदि.किरण काशिनाथ उघडा यांच्याशी संभाषण करत होते.त्याच दरम्यान भरधाव वेगाने एम.एच-०५,डी.एच-५५५२,व्यागनर,रंग सफेद,मद्यधुंद अवस्थेत असलेल्या २० ते २५ वयोगटातील पांढरपेशी सवर्ण समाजातील वर नामोल्लेखित युवकाने सदर भरधाव गाडी ही रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या आमच्या आदिवासी समाजातील मुलांच्या अंगावर घातली.सदर घटना ही दिनांक:-०३/१२/२०२०,वेळ-०८.३०वा च्या दरम्यान घडली.

एम एच 05 डी एच 5552 मध्य धुंद वॅगनार ने तीन आदिवासी निरपराध बांधवांना चिरडून फरार...| आदिवासी समाजसेविका कविता निरगुडे यांनी केली ठाणे ग्रामीण एसपीकडे तक्रार...
MH05DH552 Madhya Dhund Wagner crushes three innocent tribal brothers and escapes ... | Tribal social worker Kavita Nirgude lodged a complaint with Thane Rural SP ...
एम एच 05 डी एच 5552 मध्य धुंद वॅगनार ने तीन आदिवासी निरपराध बांधवांना चिरडून फरार...| आदिवासी समाजसेविका कविता निरगुडे यांनी केली ठाणे ग्रामीण एसपीकडे तक्रार...
एम एच 05 डी एच 5552 मध्य धुंद वॅगनार ने तीन आदिवासी निरपराध बांधवांना चिरडून फरार...| आदिवासी समाजसेविका कविता निरगुडे यांनी केली ठाणे ग्रामीण एसपीकडे तक्रार...

एम एच 05 डी एच 5552 मध्य धुंद वॅगनार ने तीन आदिवासी निरपराध बांधवांना चिरडून फरार...

आदिवासी समाजसेविका कविता निरगुडे यांनी केली ठाणे ग्रामीण एसपीकडे तक्रार...

आदिवासी समाजातील आदि.कृष्णा गोपाळ मेंगाळ,वय वर्ष-२४,आदि.पांडुरंग रामा उघडा,वय वर्ष-३५,सर्व राहणार गुंबाळवाडी,पो.पाटगाव,ता. मुरबाड,जि.ठाणे,हे शेजारीच असलेल्या मोहघर या ठिकाणी काही कामानिमित्त जावावयास निघाले होतें.दरम्यान मोहघर फाटा येथे आदि.किरण काशिनाथ उघडा,वय वर्ष-१६ हा भेटला. दरम्यान रस्त्याच्या कडेला गाडी लावून आदि.कृष्णा गोपाळ मेंगाळ,व आदि.पांडुरंग राघो उघडा,हे आदि.किरण काशिनाथ उघडा यांच्याशी संभाषण करत होते.त्याच दरम्यान भरधाव वेगाने एम.एच-०५,डी.एच-५५५२,व्यागनर,रंग सफेद,मद्यधुंद अवस्थेत असलेल्या २० ते २५ वयोगटातील पांढरपेशी सवर्ण समाजातील वर नामोल्लेखित युवकाने सदर भरधाव गाडी ही रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या आमच्या आदिवासी समाजातील मुलांच्या अंगावर घातली.सदर घटना ही दिनांक:-०३/१२/२०२०,वेळ-०८.३०वा च्या दरम्यान घडली.

सदर अपघाताने आमच्या तीनही आदिवासी समाजातील युवकांना मोठ्याप्रमाणावर शारीरिक दुखापत झाली आहे.तिघ्या अपघातग्रत बांधवांचे हात-पाय मोडले आहेत.सदर अपघाताची तीव्रता अतिशय भयानक होती.सदर आमचे आदिवासी युवक हे पाटकर हॉस्पिटल बदलापूर,ता.अंबरनाथ,जि. ठाणे येथिल खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.सदर आदिवासी युवकांची आर्थिक परिस्थिती ही अतिशय खराब असून मोलमजुरी केल्याशिवाय त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालत नाही.

तसेच हॉस्पिटलचे पैसे भरण्याचीही त्यांची परिस्तिथी नाही .आम्ही सदर उपरोक्त उल्लेखित गाडीच्या नंबरची ऑनलाईन चौकशी केली तर सदर गाडीचा नंबर आणि गाडी मॅच होत नाही असे आढळून आले आहे.तर सदर गाडी नुसार उल्लेखित नंबर नुसार चौकशी केली तर श्री.परमेश्वर राव,टाटा मोटरस,एल.टी.डी/टाटा नेक्सन,पेट्रोल गाडी असे दाखवते.तसेच अपघात होताच सदर मद्यधुंद युवकाने गाडीच्या नंबरप्लेट तोडून फेकण्याचा प्रयत्न केला.मागील नंबर प्लेट तोडून फेकण्यास सदर युवक यशस्वी झाला असून गाडीची पुढिल नंबरप्लेट तोडण्यास सदर सामनेवाल्या आडदांड,मद्यधुंद सवर्ण समाजातील युवकाला शक्य झाले नाही.

नंबरप्लेट तोडून फेकण्याचा प्रयत्न व उपरोक्त उल्लेखित नंबर  वरील नोंदणीकृत गाडी यामध्ये खूपच तफावत असल्याचे दिसून येत असल्यामुळे सदर गाडी ही चोरीची असावी याबाबतही पोलिस प्रशासनाने तपासणी करावी.

मद्यधुंद,आडदांड,सवर्ण समाजातील,प्रत्येक्ष पोलीस प्रशासनाडून पंचनामा करता वेळेस उपस्थित असणारया मद्यधुंद युवकाने आमच्या निरपराध तीन युवकांना भरधाव गाडीच्या वेगाने चिरडले आहे.

सदर आमचे आदिवासी समाजाचे युवक यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असून,मोलमजुरी केल्याशिवाय एक वेळचे अन्न मिळविणे त्यांना अशक्य असल्यामुळे,त्यांना त्यांच्यावर उपचार करणे आर्थिकदृष्टया कठीण झाले आहे.

तरी सामनेवाल्या मद्यधुंद,सवर्ण समाजातील,आडदांड युवकाची पोलीस प्रशासनाकडून कसून चौकशी होऊन,त्यावर कठोर कारवाई होवून पीडित,अपघातग्रस्त परिवाराला न्याय मिळावा.

सदर प्रकरणाबाबत आदिवासी समाजसेविका आदि.कविता वसंत निरगुडे, आदि.चेतन बांगारे(बिरसा क्रांती दल,ठाणे जिल्हा अध्यक्ष,आदि.सतीश जाधव, BKDठाणे जिल्हा महासचिव)आदि.पांडुरंग गावंडा BKD ठाणे जिल्हा उपाध्यक्ष,आदि.प्रकाश शिद BKD अंबरनाथ तालुका अध्यक्ष,आदि.एकनाथ वारघडा BKD अंबरनाथ तालुका कार्याध्यक्ष,आदि.चिंतामण जावळे BKD अंबरनाथ तालुका अध्यक्ष),आदि.पंडित पारधी BKD तालुका उपाध्यक्ष,अनंता हंबीर BKD तालुका सहसचिव,हरी जाधव BKD BKD तालुका प्रसिद्धिप्रमुख,विष्णू गोरे,अजय जाधव,अनंता गावंडे,आदी कार्यकर्ते सदर पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी नियमित उपस्थित होते.त्या बाबत सकारात्मक सामवाल्यांसोबत चर्चा होऊन सदर पीडितांच्या वैद्यकीय खर्चाची बाजू समानेवाल्यांनी उचलली आहे.

सदर आपले आदिवासी युवक हे कमीत कमी दोन वर्षे काम  धंदा करू शकत नसल्यामुळे ज्यांना सदर युवकांना आर्थिक मदत करावयाची असेल त्यांनी उपरोक्त नामोल्लेखित हॉस्पिटलमध्ये संपर्क साधावा.

मुरबाड

प्रतिनिधि - लक्ष्मण पवार 

___________