शेतकरी आंदोलनाच्या मागण्या त्वरित मान्य करा...| माकप, डीवायएफआय, एसएफआय, ऊसतोड कामगार संघटनेची निदर्शने - मोहन जाधव ....

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, ऊसतोड कामगार संघटना (सीटू), भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (डीवायएफआय)स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), शेतकरी संघर्ष समिती ने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बीडमध्ये निदर्शने करून पाठिंबा दिला.

शेतकरी आंदोलनाच्या मागण्या त्वरित मान्य करा...

माकप, डीवायएफआय, एसएफआय, ऊसतोड कामगार संघटनेची निदर्शने - मोहन जाधव ....
     

बीड [ता.3 ]मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, ऊसतोड कामगार संघटना (सीटू), भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (डीवायएफआय)स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), शेतकरी संघर्ष समिती ने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बीडमध्ये निदर्शने करून पाठिंबा दिला.

जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान यांना पाठवलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, मागील ७-८ दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे ऐतिहासिक आंदोलन सुरु आहे. शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा आणि आपल्या न्यायी हक्काच्या मागण्यांसाठी चाललेल्या संघर्षाला आम्ही युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक सक्रीय पाठींबा देत आहोत. नुकतेच २६ नोव्हेंबरला कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, तरुण आणि इतर सामान्य जनतेने आपल्या मागण्यांसाठी देशभरात आंदोलने केली. त्याच दिवसापासून हरियाना, पंजाब आणि दिल्ली शेजारील राज्यातून शेतकरी दिल्लीकडे निघाले. तेंव्हापासून ते आजपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. या आंदोलनाला देशातील हजारो ठिकाणांहून पाठींबा मिळाला आहे. आज देशभर शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला यांच्यासह युवक आणि विद्यार्थी देखील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत.

याचाच एक भाग म्हणून आम्ही बीड जिल्ह्यातील युवक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने शेतकरी आंदोलनास सक्रीय पाठींबा व्यक्त करत आहोत. तसेच शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा आणि शेतकरी आंदोलनातील सर्व मागण्या मान्य करा, अशी मागणी करत आहोत. यावेळी डीवायएफआयचे राज्य सहसचिव व ऊसतोड कामगार नेते मोहन जाधव, एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, प्रा. गणेश ढाकणे, प्रा. कुंडलिक खेत्री, दत्ता सौंदरमल, निहाल सर, कृष्णा मगर, सिध्दार्थ चव्हाण आदी उपस्थित होते.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

___________