सुशीलकुमारला स्कूटी देणारी राष्ट्रीय क्रीडापटू अडचणीत

सुशीलला मदत केल्याच्या आरोपाखाली नोटिस बजावून पोलिस तिलाही चौकशीसाठी बोलावू शकतात

सुशीलकुमारला स्कूटी देणारी राष्ट्रीय क्रीडापटू अडचणीत
Wrestler Sushil Kumar news

सुशीलकुमारला स्कूटी देणारी राष्ट्रीय क्रीडापटू अडचणीत

 सुशीलला मदत केल्याच्या आरोपाखाली नोटिस बजावून पोलिस तिलाही चौकशीसाठी बोलावू शकतात.

ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार  याच्या निकटवर्तीय महिला खेळाडूचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने सुशील कुमारविरोधात मोबाईल फूटेज आणि साक्षीदारांच्या जबाबानुसार तपास सुरु केला आहे. (The national athlete who gave Scooty to Sushilkumar is in trouble)


स्पेशल सेलने जेव्हा सुशील आणि अजय यांना अटक केली, तेव्हा ते स्कूटीने मुंडका परिसरात फिरत होते. ही स्कूटी सुशीलकुमारच्या मैत्रिणीची आहे. संबंधित महिला राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल खेळाडू आहे. सुशीलला मदत केल्याच्या आरोपाखाली नोटिस बजावून पोलिस तिलाही चौकशीसाठी बोलावू शकतात.

दुसरीकडे, सुशील कुमार तपासात सहकार्य करत नसल्याचं पोलीस अधिकारी सांगत आहेत. कुस्तीपटू सागर धनखर हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या फरार सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केली. सुशीलने वापरलेले सिम कार्ड तोडून नष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे अटकेतील आरोपी प्रिन्स दलालने रेकॉर्ड केलेला व्हिडीओ आणि अमित उर्फ सोनू यांची जबानी.

इतर आरोपींविरोधात पुराव्यांमध्ये घटनास्थळी सापडलेली वाहनं, मोबाईल आणि परवाना असलेली बंदूक यांचा समावेश आहे. सुशीलच्या सांगण्यावरुन मोबाईल आणि दांडक्यासारखे पुरावे नष्ट करण्यात आले होते. त्यामुळे त्याच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचे कलमही लावण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार सुशील कुमारवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची तयारी सुरु आहे. मोक्का अंतर्गत संघटित स्वरुपाच्या गुन्हेगारीवर कारवाई होते, मोक्का लावल्यास जामीन मिळताना अडचणी येऊ शकतात. या अंतर्गत आजन्म कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.

37 वर्षीय सुशील कुमारने 2012 च्या लंडन ऑलिम्पिक्समध्ये रौप्य, तर 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. 2008 मध्ये सुशील कुमारने जिंकलेलं पदक हे खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक्समध्ये कुस्ती प्रकारात भारताने पटकवलेलं दुसरं पदक होतं.(The national athlete who gave Scooty to Sushilkumar is in trouble)

 2009 मध्ये राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा सन्मानाने गौरवण्यात आलं होतं.