श्रमजीवी संघटनेच्या मदतीने "पोलिस पाटील बाई बनली दुर्गम भागातील मुलांसाठी ज्ञानगंगा आणणारी शिक्षिका"
कोविड संकटाच्या काळात शहापूर तालुक्यातीला ग्रामीण भागात पोलिस पाटील म्हणून काम करत असलेली ३० वर्षीय तरुणी आदिवासी दुर्गम भागातील शालेय विद्यार्थांसाठी आशेचा किरण ठरीत आहे.

श्रमजीवी संघटनेच्या मदतीने "पोलिस पाटील बाई बनली दुर्गम भागातील मुलांसाठी ज्ञानगंगा आणणारी शिक्षिका"
कोविड (covid) संकटाच्या काळात शहापूर तालुक्यातीला ग्रामीण भागात पोलिस पाटील म्हणून काम करत असलेली ३० वर्षीय तरुणी आदिवासी दुर्गम भागातील शालेय विद्यार्थांसाठी आशेचा किरण ठरीत आहे. मनिषा वाघ पोलिस पाटील जांभुळवाडचे काम करुन स्वयंसेविका म्हणून अभ्यास वर्गात शिकवीत आहेत.
डी.एड. ( शिक्षण पदविका) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या मनिषा वाघ शिक्षण क्षेत्रात नोकरीची संधी न मिळाल्यामुळे, गावचे पोलिस पाटील पदावर समाधान मानावे लागले.
कोविड (covid) परिस्थितीमुळे लागू झालेल्या टाळेबंदी मुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे, त्यात ही आपल्या आदिवासी दुर्गम भागातील मुलांपर्यंत कुठलेही ऑनलाइन शिक्षण पोहचत नसल्याने ही मुले शिक्षण प्रवाहापासून दुरावली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. आपल्या शिक्षणाचा फायदा घेत त्यांनी पुन्हा शिकवण्याची कास धरली. मान. विवेक भाऊ पडित यांनी मांडलेल्या विचारांनी ऐकून नवीन प्रेरणा घेऊन त्या आदिवासी कातकरी मुलांच्या शिक्षणासाठी पुढे सरसावल्या.
आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये भरीव काम करणाऱ्या श्रमजीवी संघटनेने याच काळात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून गावागावांत स्वतः निधी उभा करून अभ्यास वर्ग सुरू केले आहेत. याबद्दल माहिती कळताच श्रमजीवी संघटनेशी संपर्क साधला व आपले योगदान या कार्यात देण्याची इच्छा दर्शविली. श्रमजीवी संघटनेच्या मदतीने आता पहिली ते दहावी पर्यंतचे अभ्यासवर्ग सुरू केले आहेत. वृत्तसंस्थेशी बोलताना मनिषा वाघ यांनी सांगितले " मला कायमच शिक्षक बनायचे होते, कोविड (covid) परिस्थितीमुळे माझ्या लक्षात आले की, अतिदुर्गम भागातील मुलामुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे, आणि सगळ्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून द्यायची. आपण जर आशा बाळगत असू तर एक फळा आणि खडूच्या साथीने आपण शिक्षण मुलांच्या दारापर्यंत पोहचवू शकतो, हा विश्वास मला या अभ्यास वर्गांच्या माध्यमातून मिळाला". मनिषा वाघ घेत असलेल्या अभ्यास वर्गाला भेट दिली असता ११० हून अधिक विद्यार्थी त्यांच्या अभ्यास वर्गात शिक्षण घेत असल्याचे आढळून आले. त्यांचे वर्ग, गावातील मोकळी मैदाने, समाजहॉल , गावातील घर अशा कुठेही उपलब्ध होणाऱ्या जागांमध्ये सुरू आहेत. लक्ष्मण चौधरी, कैलास मुकणे, रमेश मुकणे, सोमा पोकळा, गणपत शिंगे, संतोष गिरा, तुळशी भुतांबरे या कार्यकर्त्यांना सोबत जाऊन साकडबाव विभागात भेटी देऊन तिथेही गाव कोठारे जळकेवाडी, पोकळेवाडी, जुनवणी, पायरवाडी, साकडबाव या ठिकाणी अभ्यास वर्ग सुरू केले आहेत.
श्रमजीवी संघटनेचे सचिव श्री. बाळाराम भोईर यांनी यावेळी सांगितले की संघटनेला वंचित विद्यार्थ्यासाठी ठाणे (thane), रायगड(raigad), पालघर(palghar), नाशिक(nashik) या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये ८०० हून अधिक अभ्यास वर्ग सुरू करायचे आहेत व वंचित मुलांच्या दारापर्यंत शिक्षण पोहचवायचे आहे.
शहापूर
प्रतिनिधी - शेखर पवार
______
Also see :केस गळती थांबवणे ते स्मरणशक्ती वाढवणे : जास्वंद फुलाचे हे थक्क करणारे फायदे...!!
https://www.theganimikava.com/Know-the-benefits-of-Hibiscus-Sabdariffa