शहापूरला गटशिक्षणाधिकारी मिळणार कधी?
जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारावर जनतेत नाराजी...

शहापूरला गटशिक्षणाधिकारी मिळणार कधी?
जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारावर जनतेत नाराजी
शहापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी पदावर शासननिर्णय नुसार नियुक्त झालेले प्रभाकर चौधरी हे दोनच दिवसात सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त राहिले असून अद्यापही जिल्हा स्तरावरून या पदावर नियुक्ती न झाल्याने शिक्षण विभाग अजूनही बिन पदाचा अधिकारी सारखा आहे. दरम्यान पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी यांनी मागील प्रभारी अधिकारी हिराजी वेखंडे यांचा कडे प्रशासकीय जबाबदारी दिल्याची माहिती गटविकास अधिकारी यांनी दिली आहे.
शासन निर्णय नुसार १४ सप्टेंबर ला शहापूर पंचायत समिती साठी गटशिक्षणाधिकारी देण्यात आला . २८ सप्टेंबर ला पंचायत समिती ला ते हजर झाले . मात्र हेच गटशिक्षणाधिकारी 30 सप्टेंबर ला सेवानिवृत्त झाले . यामुळे शहापूर तालुक्यात पुन्हा गटशिक्षणाधिकारी हे पद रिक्त राहिले आहे. गेली अनेक वर्षे रिक्त व प्रभारी असणाऱ्या या पदावर नियुक्ती झालेले गटशिक्षणाधिकारी शासनाच्या गलथान धोरणामुले दोनच दिवस राहिले. तालुक्यात याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. तर पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधी बाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहापूर तालुक्यात ४६८ प्राथमिक शाळा असून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असून हजारो शिक्षक कार्यरत आहेत. १४ बिटात ३२ केंद्र असून केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी कार्यरत आहेत. सदर प्रशासनावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी गटशिक्षणाधिकारी हे पद गरजेचे आहे. मात्र शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारा मुले हे पद रिक्त राहून भरले जात नाही. त्यातच गटशिक्षणाधिकारी च्या सेवानिवृत्त नंतर अजूनही या पदावर जिल्हा स्तरावरून पदभार देण्यात आलेला नाही. शहापूर तालुक्यात सातत्याने होत असलेला अन्याय त्यातच शिक्षण विभागात होत असलेले दुर्लक्ष यामुळे तालुक्यातील आगामी पिढी चे नुकसान होणार असताना लोकप्रतिनिधी मात्र अजूनही बघ्याची भूमिका घेत आहेत.
शहापूर
प्रतिनिधी - योगेश हजारे
____________
Also see : भ्रष्ट आदिवासी विकास महामंडळाचे सडके तांदूळ त्यांच्याच घशात
https://www.theganimikava.com/Corrupt-Tribal-Development-Corporations-street-rice-in-his-throat