मोदी-शाहा आणि केंद्रीय संस्थांच्या धाक-दपटशाला ममतादीदी पुरुन उरल्या

बंगालची मुलगी आणि देशाची दीदी. पश्चिम बंगालच्या जनतेवरची दीदीची मोहिनी कायम असल्याचं विधानसभा निकालानं शिक्कामोर्तब झालंय.

मोदी-शाहा आणि केंद्रीय संस्थांच्या धाक-दपटशाला ममतादीदी पुरुन उरल्या
West Bengal Assembly Election

मोदी-शाहा आणि केंद्रीय संस्थांच्या धाक-दपटशाला ममतादीदी पुरुन उरल्या

Mamata Banerjee was left in the lurch of Modi-Shah and central institutions

बंगालची मुलगी आणि देशाची दीदी. पश्चिम बंगालच्या जनतेवरची दीदीची मोहिनी कायम असल्याचं विधानसभा निकालानं शिक्कामोर्तब झालंय.

बंगालची मुलगी आणि देशाची दीदी. पश्चिम बंगालच्या जनतेवरची दीदीची मोहिनी कायम असल्याचं विधानसभा निकालानं शिक्कामोर्तब झालंय. मोदी-शाह आणि केंद्रीय संस्थांच्या धाक-दपटशाला ममतादीदी पुरुन उरल्या. मोदी-शाहांनी ममतांसमोर अभूतपूर्व आव्हान निर्माण केलं होतं.

ममतांचं नेतृत्व यातून तावून सुलाखून निघालं. पश्चिम बंगालचं हे बावन्नकशी सोनं दोन बड्या गुजराती नेत्यांवर भारी पडलं. केजरीवालानंतर ममता बॅनर्जीच भाजपच्या या दुकलीचा प्रभावी आणि एकहाती यशस्वी सामना करु शकल्या.

ज्या नंदीग्राममधून त्या आज निवडून आल्या तिथूनच त्यांची पश्चिम बंगालच्या प्रादेशिक राजकारणाची नांदी झाली होती. 2007 साली डाव्या सरकारनं एसईझेडसाठी भूसंपादन केले, पण कुठलेही औद्योगिक प्रकल्प ते आणू शकले नाहीत. जमीन परत करा अशी स्थानिकांची मागणी होती.

त्याचे नेतृत्व ममतांनी केले. आंदोलन चिघळलं आणि पोलीस गोळीबारात 14 लोकांचा मृत्यू झाला. 2008 मध्ये सिंगूरमध्ये टाटांच्या नॅनो प्रकल्पाला विरोध होत होता. डाव्यांच्या सरकारनं 1894 चा कायदा लावून 997 एकरांचं भूसंपादन केलं होतं. ममतांनी हे आंदोलन हाती घेतलं आणि प्रकल्प रद्द होईपर्यंत त्या लढत राहिल्या.

या दोन आंदोलनामुळं पुराणमतवादी बंगाली लोकांनी ममतांमध्ये भावी मुख्यमंत्री पाहिला. तीन वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत ममतांना अभूतपूर्व यश मिळालं आणि बुद्धदेव भट्टाचार्यांच्या रुपानं पश्चिम बंगालमधील डाव्यांचा शेवटचा मुख्यमंत्री देशानं पाहिला.

2011 साली त्यांनी पश्चिम बंगालमधला डाव्यांचा 34 वर्षांपासूनचा अभेद्य गड सर केला आणि पश्चिम बंगालची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. हा पराक्रम त्यांनी 2017 मध्येही केला आणि आता 2021 मध्येही केला.

नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंह अशा 90 नंतरच्या पंतप्रधानांसोबत काम करण्याचा अनुभव ममता बॅनर्जींच्या गाठीशी आहे. अटलबिहारी वाजपेयींकडून पश्चिम बंगालला हवी तशी मदत मिळत नव्हती तर त्यांनी वाजपेयींनाही हैराण करुन सोडलं होतं.

वाजपेयी कोलकात्यात गेले तेव्हा ममतांच्या आईंना भेटले होते. त्यावेळी वाजपेयींनी “आप की बेटी बहुत तंग करती है” अशी गंमत वाजपेयींनी केली होती. ममता बॅनर्जी कणखर आहेत. अन्यायाविरुद्ध लढताना त्या भीडभाड ठेवत नाहीत.

विधानसभा निवडणुकीत मोदींनी “दीदी ओ दीदी” म्हणून उपहास केला. ममता जिथं जातील तिथं भाजपचे कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा देऊन नाउमेद करत होते. सीएएच्या मुद्यावरुन भाजपनं पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्व कार्ड वापरुन जबर ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाच्याच्या घरावर सीबीआयच्या धाडीही टाकल्या गेल्या. पण भाजपच्या या डावपेचांनी ममता खचून गेल्या नाहीत. उलट जेवढा टोकाचा द्वेष होईल तेवढ्या त्या जखमी वाघिणीसारख्या उफाळून वर आल्या. त्यामुळंच की काय ममता बॅनर्जींचा हा विजय पश्चिम बंगालपुरताच मर्यादित राहत नाही. भाजपच्या दांडगाईला त्यांनी दिलेलं उत्तर देशभरातले भाजपविरोधक आपला विजय म्हणून मिरवत आहेत.

म्हणूनच आगामी काळात युपीएचं नेतृत्व ममतांकडे गेलं तर आश्चर्य वाटायला नको.