जलसंपदा मंत्री यांची गारगाई धरणातील लाभक्षेत्र असणाऱ्या गावांना पाणीसाठा देण्यास सहमती

वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ मुबंई महानगरपालीकेला पाणी पुरवठा करण्यासाठी मंजूर केलेल्या गारगाई धरणातील पाच टक्के पाणी लाभक्षेत्र असणाऱ्या भागाला आरक्षित करण्यात यावे......

जलसंपदा मंत्री यांची गारगाई धरणातील लाभक्षेत्र असणाऱ्या गावांना पाणीसाठा देण्यास सहमती
Water Resources Minister agrees to provide water storage to villages benefiting from Gargai Dam

जलसंपदा मंत्री यांची गारगाई धरणातील लाभक्षेत्र असणाऱ्या गावांना पाणीसाठा देण्यास सहमती

वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ मुबंई महानगरपालीकेला पाणी पुरवठा (water supply) करण्यासाठी मंजूर केलेल्या गारगाई धरणातील पाच टक्के पाणी लाभक्षेत्र असणाऱ्या भागाला आरक्षित करण्यात यावे असे निवेदन जुलै महिन्यात महाराष्ट्र (maharashtra) राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या कडे शहापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार दौलत दरोडा दिले होते.त्यासंदर्भात आज झालेल्या आढावा बैठकी मध्ये गारगाई धरण प्रकल्पात नियोजन करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुबंई (mumbai) महानगर पालिकेला दिलेले आहेत .

वाडा तालुक्यातील गारगाई धरण क्षेत्रात एकूण नऊ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.या गावातील सर्व लोकांचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेती हा एकमेव पर्याय आहे.त्यामुळे पुढिल २० वर्षाचा नियोजन करून पाणी साठा उपलब्ध  करून मिळाल्यास येथील शेतकरी सुजलाम सुफलाम होऊन मोठ्या प्रमाणात शेती सिंचन खाली येऊन पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघू शकतो.

यासाठी या मंजुर असणाऱ्या गारगाई धरणातील जलसाठ्या पैकीं लाभक्षेत्र असणाऱ्या गावांना  एकूण पाण्यापैक्की पाच टक्के पाणीसाठा परळी,वरसाळे  गारगांव,मांडावा,पीक,मानिवली, डाहे,देवळी,मांगरूळ या नऊ  गावातील १७८५१ लोकांना या पाण्याचा सिंचनसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्द्ध करून द्यावी अशी मागणी  आमदार दौलत दरोडा यांनी  स्थानिकांच्या मागणी नुसार केली होती. या मागणीला या बैठकीमध्ये जलसंपदा मंत्री यांनी सहमती दर्शविल्याने या लाभ क्षेत्रातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

 वाडा

प्रतिनिधी - जयेश घोडविंदे

_______

Also see : २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्लस पोलिओ मोहिमेची यशस्वी अमलबजावणी करण्यात येणार

https://www.theganimikava.com/The-Plus-Polio-Campaign-on-September-20-will-be-successfully-implemented