जिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहाण्याचे आवाहन....

जिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
Warning of torrential rains in the district till October 17

जिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहाण्याचे आवाहन 

नंदुरबार : हवामान खात्याने जिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत वीजेच्या कडकडाटासह मूसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने नदीकाठी रहाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे व योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 खबरदारीची उपाययोजना म्हणून विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे.  मोकळ्या जागेत असल्यास आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे.

 आकाशात विजा चमकत असल्यास घरात‍ किंवा सुरक्षित इमारतीत आसरा घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. घरात असताना आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्वरीत बंद करावे. ताराचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूपासून दुर राहा. पाण्यात उभे असल्यास तात्काळ पाण्यातून बाहेर पडाव.

या गोष्टी करू नका

1) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करु नका. 2) शॉवरखाली आंघोळ करु नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका. 
3) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे असतांना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेवू नका. 
4)उंच झाडाच्या खाली आसरा घेवू नका. 
5) धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नका. 
6)घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडतांना पाहू नका, 
हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश

जिल्ह्यात 17 ऑक्टोबर पर्यंत विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असल्याने तलाठी, मंडळ अधिकारी व तालुका स्तरीय अधिकारी यांनी याबाबत आवश्यक ती खबरदारी घेवून मुख्यालय सोडू नये. तसेच मंडळ निहाय पावसाचा व नुकसानीचा अहवालाची माहिती तालुका नियंत्रण कक्षात घ्यावी व दर दोन तासांनी जिल्हा नियंत्रण कक्षास पाठवावी.

तालुका मुख्यालयाचा नियंत्रण कक्ष 24 तास  कार्यरत ठेवावा. जिल्ह्यातील नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी वाढून पूर येण्याची शक्यता लक्षात घेता  नदीकाठालगतच्या नागरीकांनी  सतर्क रहावे व योग्य दक्षता घ्यावी,  असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी केले आहे.

बीड

प्रतिनिधी  - विश्वनाथ शरणांगत

____________

Also see : ‘आय.एम.ई.डी.गेम्स महोत्सवचे’ उदघाटन

https://www.theganimikava.com/Inauguration-of-IMED-Games-Festival