वेदांता लॅब मुळे जास्तीत जास्त चाचण्या करता येणे शक्य,मृत्यू दर घटण्याची शक्यता-खा.राजेंद्र गावित
वेदांता येथील कोव्हीड लॅब चे खा.राजेंद्र गावित आणि जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांच्या हस्ते उदघाटन...

वेदांता लॅब मुळे जास्तीत जास्त चाचण्या करता येणे शक्य,मृत्यू दर घटण्याची शक्यता-खा.राजेंद्र गावित
वेदांता येथील कोव्हीड लॅब चे खा.राजेंद्र गावित आणि जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांच्या हस्ते उदघाटन
वेदांता मेडिकल आणि रिसर्च सेंटर हे केवळ कोव्हीड रुग्णांपुरती मर्यादित न राहता आता येथे कोव्हीड 19 RTPCR चाचण्या करण्यासाठी लॅब सुरू होत आहे ही आनंदाची गोष्ट असून यामुळे अधिक रुग्ण समोर येऊन त्यावर लवकारात लवकर उपाचर होऊन मृत्युदर घटण्याची शक्यता आहे.असे प्रतिपादन खा.राजेंद्र गावित यांनी केले.
वेदांत हॉस्पिटल येथे RTPCR या कोव्हीड चाचणी परवानगी देण्यात आलेली सदर लॅबचे उद्घाटन खा. राजेंद्र गावित आणि जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते सहाय्यक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल तसेच तहसीलदार राहुल सारंग यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले.
त्यावेळी खा.राजेंद्र गावित बोलत होते.
पालकमंत्री दादाजी भुसे आणि खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नांनी ही लॅब सुरू करणे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले.
तसेच या लॅब च्या स्थापनेसाठी वेदांत हॉस्पिटल चे अधिष्ठाता डॉ. चतुर्वेदी सर तसेच डॉ. अरुण मोहपरेकर यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे असे सांगून लवकरच सुरू होत असलेल्या डी सी एच सुविधेची पाहणी खा.गावित व जिल्हाधिकारी यांनी केली. सदर सुविधा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी सूचना सहा.जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना दिली.
एक विशेषज्ञ व चार प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या मार्फत सुरवातीला दिवसागणिक ४२ते ५० चाचण्या करण्यात येतील.परंतु कालांतराने या क्षमते मध्ये वाढ करण्यात येईल अशी माहिती वेदांता हॉस्पिटल चे अधिष्ठाता डॉ.चतुर्वेदी यांनी यावेळी दिली.
सफाळे पालघर
प्रतिनिधी - रविंद्र घरत
__________
Also see : बहुजन क्रांति मोर्चाच्या माध्यमातून हाथरस अत्याचाराबाबत आंदोलनाची घोषणा