नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे लवकर बरे होण्यासाठी शिवसेनेतर्फे ‘ महाआरती '

राज्याचे नगरविकास मंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत...

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे लवकर बरे होण्यासाठी शिवसेनेतर्फे ‘ महाआरती '
Urban Development Minister Eknath Shinde on behalf of Shiv Sena for early recovery

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे लवकर बरे होण्यासाठी शिवसेनेतर्फे ‘ महाआरती    

ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  एकनाथ शिंदे लवकर बरे व्हावे यासाठी शिवसैनिक ठिकठिकाणी धार्मिक विधी आणि कार्यक्रम आयोजित करत आहेत. कल्याण पश्चिमेतील शिवसेना बिर्ला कॉलेज विभागीय शाखेतर्फे आज सायंकाली भोईरवाडी येथिल हनुमान मंदिरात ‘ महाआरती’ करण्यात आली .

 ज्यामध्ये बिर्ला कॉलेज शिवसेना शाखा परिसरातील अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .एकनाथ शिंदे यांची प्रकृति स्थिर असुन ते लवकरात लवकर पुन्हा महाराष्ट्राच्या सेवेत रूजु व्हावे या प्रमुख उद्देशाने ही महाआरती करण्यात आल्याची माहीती आयोजक आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख रवी पाटिल यांनी दिली.

भिवंडी, ठाणे 
प्रतिनिधी - सत्यवान तरे 

________

Also see : भाजप पुणे अल्पसंख्य आघाडीच्या प्रभारीपदी अली दारूवाला 

https://www.theganimikava.com/Ali-Daruwala-in-charge-of-BJP-Pune-Minority-Front