नगरसेविका साक्षी चौधरी यांचा अनोखा उपक्रम
आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला एलईडी व वाय-फायची सुविधा केली उपलब्ध......

नगरसेविका साक्षी चौधरी यांचा अनोखा उपक्रम
आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला एलईडी व वाय-फायची सुविधा केली उपलब्ध
मुरबाड शहरातील वार्ड क्रमांक 13 उगले आलीच्या नगरसेविका साक्षी संतोष चौधरी या नेहमीच समाजोपयोगी कामासाठी तत्पर असतात. नागरिकांची समस्या ती आपलीच समस्या आहे. असे समजणाऱ्या साक्षी चौधरी यांच्या कामाचा लेखाजोखा मुरबाड शहरवासीयांच्या डोळ्यासमोर दिसून येत आहे.
त्यातच आज त्यांनी मुरबाड कोविड सेंटरमधील (covid centre) रुग्ण, कर्मचारी, डॉक्टर्स यांना दूरदर्शन वरील मनोरंजक व देशभरातील विविध घडामोडी पाहता याव्यात यासाठी नगरसेविका साक्षी संतोष चौधरी यांनी कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोविद सेंटरला (covid centre) वायफाय सुविधा व एलईडी टीव्ही भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत मुरबाड भाजप (bjp) पक्षाचे तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव, भाजप (bjp) ठाणे जिल्हा ग्रामीण महिला आघाडी अध्यक्षा सौ शितल दिनेश तोंडलीकर, भाजप ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस नितीन मोहोपे सर, मुरबाड शहर अध्यक्ष सुधीर भाई तेलवणे, प्रसाद पोद्दार, संतोष चौधरी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते कोबी केअर सेंटर मधील डॉक्टर्स आणि कर्मचारी वृंद यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
_______
Also see : कल्याण डोंबिवलीत ५३७ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू
https://www.theganimikava.com/537-new-patients-and-5-deaths-in-Kalyan-Dombivali