जन आरोग्य योजने अंतर्गत उपचार घेण्यासाठी लागणारे राशेनकार्ड घेण्यासाठी  गेवराईकरांना पुरवठा तहसीलदार उपलब्ध होत नाही - ॲड. सदानंद वाघमारे.

कित्येक लोकांचे कार्डामध्ये नांवे आसतांना त्यांचे नांवे काढून टाकण्याचा प्रयत्न हे राशेन दुकांनदार लोक करतात .

जन आरोग्य योजने अंतर्गत उपचार घेण्यासाठी लागणारे राशेनकार्ड घेण्यासाठी  गेवराईकरांना पुरवठा तहसीलदार उपलब्ध होत नाही -  ॲड. सदानंद वाघमारे.
Under the Jan Arogya Yojana, there is no supply chain available for Gevraikars to get the ration card required for treatment - Adv. Sadanand Waghmare.

जन आरोग्य योजने अंतर्गत उपचार घेण्यासाठी लागणारे राशेनकार्ड घेण्यासाठी  गेवराईकरांना पुरवठा तहसीलदार उपलब्ध होत नाही- ॲड. सदानंद वाघमारे.

गेवराई येथील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तीनेसंबंधित योजने अंतरर्गत दवाखाण्यासाठी लाभ मिळावा यासाठी माननीय पुरवठा तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज सादर केला. संबंधीत आर्जदाराचे कुंटूबातील नातेवाईक हे पुणे या ठिकाणी दवाखाण्यात अ‍ॅडमिट  आहेत. ही योजना गोरगरीब कष्टकरी, शेतमजूर, कामगार, अंध - अपंग, मूकबधिर यांना मिळण्यासाठी असते. गाव पातळीवर राशेन दुकानदार हे कांही ठराविक गावातील रहिवाशी आसतांना सुद्धा मनमानी करून  राशेन कार्डामध्ये नांवे लावत नाहीत. व त्या व्यक्तींना कार्ड देण्याचे टाळाटाळ करत आहेत.

कित्येक लोकांचे कार्डामध्ये नांवे आसतांना त्यांचे नांवे काढून टाकण्याचा प्रयत्न  हे राशेन दुकांनदार करतात. त्या राशेन दुकानदारास संबंधीत विभागाचे तहसिलदार हे पण दुजारा देतात. आज त्याचा प्रत्यय गेवराई तहसिलला संमक्ष मिळाला. त्यामूळे आज हे प्रसिद्धीसाठी पत्रक देवुन कळवले आहे. गेवराई सह बीड जिल्ह्यातील अनेक खेड्यापाड्यातील गोरगरीब, कष्टकरी कामगार, मजूर, शेतकरी हे ब्रेन ट्यूमर, हार्ट अटॅक, अर्धांगवायू यासारख्या मोठ्या आजारांना बळी पडत असतानाही त्यांना सहकार्य करण्याचे सोडून माननीय तहसीलदार साहेब हे आपल्या कार्यालयात उपलब्ध होत नसल्यामुळे गरजू आजारी पेशंटला तहसील कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत असल्याचा आरोप जनप्रहार सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय सचिव ऍड. वाघमारे यांनी केला आहे. शेतकरी कामगारांच्या आजारांची व औषधोपचारांची तहसीलदारांना होत नसेल तर व शासकीय कामे होत नसतील तर त्यांनी पदाचा राजीनामा देण्याची मागणी ॲड.सदानंद वाघमारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. संबंधित तहसीलदार कार्यालयातील तहसीलदार कार्यालयात उपलब्ध न झाल्यास गेवराई तालुक्यात बीड जिल्ह्यातील इतर सर्व तहसीलदार यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा जनप्रहार सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय सचिव ऍड.सदानंद वाघमारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.


 बीड 
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

_____________

Also see : रिक्षा चालकाच्या प्रमाणिकपणामुळे महिलेला दागिने परत, रिक्षा चालकाचा पोलिसांकडून सन्मान

https://www.theganimikava.com/rickshaw-drivers-honesty-returns-jewelry-to-woman-rickshaw-driver-honored-by-police