लॉकडाऊनच्या काळात घणसोलीत अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट...

सिडको व महानगरपालिका  अधीकारी वर्गाचे कारवाई कडे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?

लॉकडाऊनच्या काळात घणसोलीत अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट...
Unauthorized construction in Ghansoli during the lockdown
लॉकडाऊनच्या काळात घणसोलीत अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट...

लॉक डाऊनच्या काळात घणसोलीत अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट.

सिडको व महानगरपालिका  अधीकारी वर्गाचे कारवाई कडे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?


- अनिल भास्करराव काकडे


नवी मुंबई : नवी मुंबई शहरात सध्या कोरोनाचे  संक्रमण वाढत असल्याने मनपाचे सर्व  लक्ष कोरोना नियंत्रणाकडे लागले आहे आणि याचाच फायदा घेत घणसोली परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले मात्र या अनधिकृत बांधकामांकडे  अतिक्रमण विभागातील अधीकारी अर्थपूर्ण  दुर्लक्ष करत असून झोपेचे सोंग घेऊन काहीही कारवाई करत नाही. 
यामुळे अनधिकृत इमारतींचे जाळे उभे राहिले त्यामुळे या बांधकामांवर मनपाने कारवाई करावी मागील ६ महिन्यापासून सगळीकडेच कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असून सगळी यंत्रणा व कर्मचारी कोरोना शी दोन हात करत आहेत याच संधीचा फायदा घेत भूमाफियांनी अनधिकृत बांधकाम करण्याचा जणू सपाटाच लावला आहे यात आघाडीवर नविमुंबईतील घणसोली विभागात अनधिकृत बांधकामाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच असून या अनधिकृत बांधकामावर महानगरपालिका अधिकारी वर्ग व भूमाफियांचे अर्थपूर्ण हितसंबंध असल्यामुळे कार्यवाही करत नाही अशी चर्चा सर्वसामान्य जनता करत आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी एक रात्रीत स्लॅब चढवले जात आहेत आणि या बांधकामाचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून भविष्यात भिवंडी  सारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महानगरपालिका प्रशासन या अनधिकृत बांधकामावर दिखाव्यासाठी नाममात्र कार्यवाही करते आणि पुन्हा परिस्थिती जैसे थेच असते ही कार्यवाही पाहिल्यावर
"मी मारल्या सारख करतो तू रडल्यासारखं कर"
याच म्हणीचा प्रत्यय येतो.
भूमाफियांचे व अधिकारी वर्गाचे साटेलोटे असल्याशिवाय एवढे अनधिकृत बांधकाम होऊच शकत नाही या बद्दल वारंवार तक्रारी करून सुद्धा काहीही होत नाही.
भविष्यात येथे भिवंडी सारखी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी अधिकारी वर्ग घेईल का.?
की नेहमीप्रमाणे कार्यवाहीचा बागुलबुवा करून प्रशासन गप्प बसण्यातच धन्यता मानणार व अप्रत्यक्षपणे अनधिकृत बांधकामाना साहकार्य करणार.

नवी मुंबई

प्रतिनिधी - अनिल भास्करराव काकडे

______

Also see : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वाडा येथे रक्तदाब शिबिर संपन्न 

https://www.theganimikava.com/Conducted-blood-donation-camp-at-Wada-through-Jijau-Educational-and-Social-Organization