उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याचा काळ कठीण, सर्वांनी एकत्र येणं आवश्यक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येणार का, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.

उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याचा काळ कठीण, सर्वांनी एकत्र येणं आवश्यक
Uddhav Thackeray news

उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याचा काळ कठीण, सर्वांनी एकत्र येणं आवश्यक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  एकत्र येणार का, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे  आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येणार का, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंनी दिलेल्या उत्तरावर प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला.(Uddhav says the present is a difficult time, everyone needs to come together)

त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्या गोष्टी परमेश्वराला माहिती असतील, त्या मला माहिती असणं शक्य नाही”देशासाठी, राज्यासाठी जे एकत्र येऊ शकतात, त्यांनी आताच्या घडीला एकत्र यावं, सध्या देशात जे संकट आहे ते साधंसुधं नाही, या परिस्थितीला योग्यप्रकारे सामोरं गेलो नाही तर देशात अराजक येईल.


 खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं, पण काळ कठीण आहे. पुत्रकर्तव्य म्हणून मी खुर्चीवर आहे. बाळासाहेबांना हातात हात देऊन वचन दिलं होतं, तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवेन, मात्र अजून माझं वचन पूर्ण झालेलं नाही. मी पुत्र म्हणून त्यांना वचन दिलं.. मी जबाबदारी घेतली, मी माझ्यासाठी काही करत नाही, मला मुख्यमंत्रिपदाची अभिलाषा नव्हती. खुर्ची हे वैभव आहे, देवाची दया आहे, अनेकांचं स्वप्न या खुर्चीचं होतं. 


तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा सवाल करण्यात आला. (Uddhav says the present is a difficult time, everyone needs to come together)

तेव्हा, म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणालो.