अमेरिकेसाठी सर्वात मोठा दिवस

अमेरिकेसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे. कारण अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी मास्क काढला आहे.

अमेरिकेसाठी सर्वात मोठा दिवस
US corona news

अमेरिकेसाठी सर्वात मोठा दिवस

The biggest day for America

अमेरिकेसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे. कारण अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन  यांनी मास्क काढला आहे.

अमेरिकेसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे. कारण अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन  यांनी मास्क काढला आहे. लस घेतलेले लोक आता गर्दी नसलेल्या ठिकाणी विनामास्क फिरु शकतात, अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ज्यांनी लस घेतली आहे, त्यांनी मास्क काढण्यास हरकत नाही, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर जो बायडन यांनी अमेरिकेसाठी हा सर्वात मोठा दिवस असल्याचं म्हटलं आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या नियमावलीनंतर, जोय बायडन यांनी आपल्या कार्यालयातील खासदारांसह आपला मास्क उतरला.

नव्या नियमांनुसार, अमेरिकेतील नागरिक आता खुल्या किंवा बंद ठिकाणी, जिथे गर्दी नाही तिथे विनामास्क फिरु शकतात. मात्र गर्दीची ठिकाणं असलेल्या बंद जागा जसे की बस, विमान प्रवास, रुग्णालये, प्रार्थनास्थळे अशा ठिकाणी मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे.

ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे, त्यांनी बायडन प्रशासनावर कोरोना नियम कमी करण्यासाठी दबाव आणला होता. लसीकरणामुळे अमेरिकत कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याचं चित्र आहे. त्याशिवाय अमेरिकन फेडरेशन ऑफ टीचर्स लेबर युनियननेही येत्या काळात शाळा सुरु करण्याची शिफारस केली आहे. 12 ते 15 वर्षांच्या मुलांना फायजर लस देण्यास मंजुरी मिळाल्याने, ही शिफारस करण्यात आली आहे.

अमेरिकेत जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि कोरोना मृतांची संख्या नोंदली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून इथे रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे.

सरकारी आकड्यांनुसार सप्टेंबर 2020 नंतर अमेरिकेत कोरोना रुग्णसंख्या घटण्यास सुरुवात झाली. तर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून मृतांची संख्याही कमी झाली.अमेरिकेत कोरोनाबाबत नवी नियमावली आल्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमात मास्क उतरवला.


या कार्यक्रमात जो बायडन यांनी अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लस घेण्याचं आवाहन केलं. जो बायडन यांनी याबाबत ट्विटही केलं आहे. ते म्हणतात, “नियम आता एकदम सरळ आहेत. लस घ्या किंवा मग जोपर्यंत लस घेत नाही तोपर्यंत मास्क घाला. याची निवड तुम्हाला करायची आहे, ही तुमची मर्जी आहे”

अमेरिकेत वेगाने लसीकरण सुरु आहे. जवळपास 35 टक्के लसीकरण झाल्यानंतर वैद्यकीय यंत्रणेने लस घेतलेल्यांनी मास्क वापरण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेत जुलैपर्यंत 70 टक्के लसीकरणाचं लक्ष्य आहे.

ज्यांनी कोरोना लस घेतली आहे, ते बंद किंवा खुल्या जागी विनामास्क जाऊ शकतात. कोरोना महामारीमुळे जी कामं थांबली होती, ती आता सुरु करु शकता.

आता आपण सामान्य परिस्थितीकडे वाटचाल करत आहोत, असं अमेरिकेच्या वैद्यकीय यंत्रणेने म्हटलं आहे.