बोईसर येथील आरती ड्रग्ज कंपनीत युग्लासचा स्फोट, दोन कामगार जखमी

बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील आरती ड्रग्ज कंपनीमध्ये युग्लासच्या स्फोटात दोन कामगार जखमी झाले....

बोईसर येथील आरती ड्रग्ज कंपनीत युग्लासचा स्फोट, दोन कामगार जखमी
Two workers injured in blast at Aarti Drugs Company in Boisar
बोईसर येथील आरती ड्रग्ज कंपनीत युग्लासचा स्फोट, दोन कामगार जखमी
बोईसर येथील आरती ड्रग्ज कंपनीत युग्लासचा स्फोट, दोन कामगार जखमी

बोईसर येथील आरती ड्रग्ज कंपनीत युग्लासचा स्फोट, दोन कामगार जखमी

   

  बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील आरती ड्रग्ज कंपनीमध्ये युग्लासच्या स्फोटात दोन कामगार जखमी झाले असून ही घटना मंगळवारी रात्री माल उत्पादन प्रक्रिया सुरू असताना सर्वप्रथम या ठिकाणी स्फोट होऊन आग लागली होती. मात्र कामावर असलेल्या कामगारांनी या आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे या स्फोटाची माहीती अग्निशमन दलाला देण्यात आली नाही.
      औद्योगिक क्षेत्रात असलेल्या आरती ड्रग्ज प्लॉट नं. एन १९८ या औषधांचा कच्चा माल बनविण्याऱ्या कारखान्यात मंगळवारी रात्री रिॲक्टरमध्ये माल बनविण्याची रासायनिक प्रक्रिया सुरू असताना एका रिॲक्टरमधून दुसऱ्या रिॲक्टरमध्ये रासायनिक पदार्थ पाठवतेवेळी हवेच्या दाबामुळे रिॲक्टरजवळ असणाऱ्या युग्लासचा मंगळवारी रात्री १०:१० वाजल्याच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली. यावेळी या ठिकाणी कामावर असलेले ऑपरेटर कामगार प्रदीप पाटील व शांताराम जाधव हे जखमी झाले. विशेष म्हणजे हा स्फोट होऊन सुद्धा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता पाचारण करण्यात न आल्याचे उघड झाले आहे. जखमी कामगारांना बोईसर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

_______

Also see : तरूण पञकारांचे मार्गदर्शक  किशोरजी बळीराम  पाटील साहेब

https://www.theganimikava.com/A-guide-for-young-people-Kishoreji-Baliram-Patil-Saheb