समीर मोरे, सुनिल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पालघर सविनय कायदेभंग

लोकल रेल्वे सेवा बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांना रोजगारासाठी बसने प्रवास करावा लागतो.....

समीर मोरे, सुनिल राऊत यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करीत पालघर ते केळवा रोड स्टेशन पर्यंत रेल्वे प्रवास

     

लोकल सेवा (local service) सुरू करा ही सर्वमान्य मागणी करीत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) उपजिल्हाध्यक्ष समीर मोरे, पालघर शहराध्यक्ष सुनिल राऊत यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करीत पालघर ते केळवा रोड स्टेशन पर्यंत रेल्वे प्रवास केला.

लोकल रेल्वे सेवा (local railway service) बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांना रोजगारासाठी बसने प्रवास करावा लागतो. त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकल रेल्वे सेवा सुरू करा अशी सर्वमान्य मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची होती. त्यामुळे सविनय कायदेभंग करून रेल्वे प्रवास करणार अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (maharashtra navnirman sena) होती. त्या अनुषंगाने आज मनसेचे उपजिल्हाध्यक्ष समीर मोरे, पालघर (palghar) शहराध्यक्ष सुनिल राऊत यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पालघर ते केळवा रोड स्टेशन पर्यंत रेल्वे प्रवास केला.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

_______

Also see : ग्रामपंचायतींच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजाचा निधी कोणाच्या घशात 

https://www.theganimikava.com/Who-has-the-interest-fund-of-the-14th-Finance-Commission-of-the-Gram-Panchayat