ऐनशेत गावावर शोककळा
कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक अशोक ठाकरे यांचे दुःखद निधन

ऐनशेत गावावर शोककळा
कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक अशोक ठाकरे यांचे दुःखद निधन
वाडा तालुक्यातील कॉंग्रेसचे (congress) जेष्ठ कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक (builder) अशोक कुशाभाऊ ठाकरे यांचे काल दि. ७ सप्टेंबर रोजी कोरोनाने (corona) वयाच्या ६९ व्या वर्षी दु:खद निधन झाले. मौजे ऐनशेत, ता. वाडा येथील रहिवासी असलेले अशोक ठाकरे यांच्यावर गेले १० दिवस काल्हेर ता. भिवंडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
अशोक ठाकरे हे वाडा तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नामांकित व्यक्तीमत्व होते. कॉंग्रेस आयचे जिल्हा उपाध्यक्ष, ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक, लायन्स क्लब (lions club) ऑफ वाडाचे अध्यक्ष, ऐनशेत ग्रामपंचायतीचे सरपंच अशी विविध पदे त्यांनी भूषविली होती. याबरोबरच प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, एक प्रयोगशील शेतकरी व वाड्यातील सर्वांत जुन्या अशा अशोक टी हाऊसचे मालक म्हणूनही ते तालुक्यात प्रसिद्ध होते. एक हसतमुख व सुस्वभावी व्यक्तीमत्वाच्या अचानक जाण्याने ऐनशेत गांव व वाडा तालुक्यात सर्व क्षेत्रांतून शोक व्यक्त होत आहे.
वाडा
प्रतिनिधी - जयेश घोडविंदे
________
Also see: नदीत अंत्यसंस्कार सुरू असताना मृतदेह गेला वाहून.
https://www.theganimikava.com/The-River-carried-away-body-during-the-funeral